यावल संजय गांधी निराधार समितीवर सदस्यपदी तुषार पाटील , जावेद अली , संदीप सोनवणे यांची निवड

दिपक नेवे

.                   यावल येथील नुकतीच जाहीर करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी मारूळ येथील अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्ते सैय्यद जावेद अली महमंद व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार (उर्फ मुन्ना ) पाटील ,वढोदे येथील सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे . दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या शिफारसीने व जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षपदी शेखर सोपान पाटील यांची निवड झाली असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य म्हणुन मारूळ येथील सैय्यद जावेद अली व वढोदे येथील संदीप सोनवणे यांची निवड करण्यात आली असुन ,त्यांच्या निवडीचे आमदार शिरिष चौधरी , काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवीन्द्र सोनवणे , काँग्रेस कमेटीचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, शिवसेना यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , शरद कोळी , संतोष खर्चे, दहिगावचे सरपंच अजय भालेराव , काँग्रेस सेवा फाउंडेशनचे जलील पटेल, कॉंग्रेस आदीवासी सेलचे तालुका अध्यक्ष बशीर तडवी , अभय महाजन , विक्की पाटील , धिरज कुरकुरे , रमेश पाटील , हाजी गफ्फार शाह, मारूळचे जिया सर यांनी स्वागत केले आहे .

jalgaonsandesh

jalgaonsandesh