यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारतीचा लोकापर्ण सोहळा पालकमंत्र्यांच्या उपस्थित संपन्न झाला कार्यक्रमावर काँग्रेस व राष्ट्रवादीने टाकला होता बहीष्कार

दिपक नेवे

यावल-शेतकऱ्याच्या पोटाला जात, पात, धर्म नसतो. शेतकरी जिवंत राहीला पाहीजे म्हणून आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात गांभीर्याने असून शेतकऱ्यांच्या विजबील सह, भारनियमनबाबत पाठपुरावा करणार आहे. फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यावर अनेकांचे रोजगार अवलंबून असून सेवा देणारे उपक्रम सुरु रहावे यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिले.

यावल येथे पंचायत समितीचे नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील बोलत होते. या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमास चोपडा मतदार संघाचे आमदार सौ .लताताई चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ रंजना प्रल्हाद पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जिल्हा परिषदच्या सदस्य सौ सविता भालेराव, सौ नंदा सपकाळे, पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन, कार्यकारी अभियंता सुधीर धिवरे, जळगावचे माजी नगराध्यक्ष विष्णू भंगाळे, मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद जिवराम महाजन, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुषार पाटील, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुरुजित चौधरी, येथील माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, माजी तालुकाप्रमुख कडू पाटील, नगरसेवक डॉक्टर कुंदन फेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. नरेंद्र वामन कोल्हे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुनील फिरके, नरेंद्र नारखेडे आदी मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकापर्ण सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी यांनी केले. याप्रसंगी बोलतांना माजी मंत्री गिरीष महाजन यांनी माजी आमदार ( कै.) हरीभाऊ जावळेंची आठवण काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी धडपडणारे, सतत पाठपुरावा करणारे कै . हरीभाऊ जावळे नेहमी शेतकऱ्यांसाठीच झटत असत. कोरोना विषाणूच्या महामारीनंतर अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतांना राज्य शासनाने वीजबिल वसुली मोहीम तीव्र केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त झाला असुन प्रसंगी आत्महत्या करीत असल्याचे देखील प्रकार घडत आहे . यामुळे राज्यातला शेतकरी वर्ग वैतागला आहे. असे आ . गिरीष महाजन म्हणाले.

यावेळी माजी जि.प. सदस्य हर्षल पाटील, कृषी उत्पन्न चे माजी सभापती कृषी भुषण नारायण चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, कृउबाचे संचालक राकेश फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, कांचन फालक, गोपालसिंग पाटील, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, किशोर कुलकर्णी, शिवसेनेचे पप्पू जोशी, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, सागर देवांग, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, गटविकास अधिकारी व्ही.एन. भाटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले. तर पं.स. सदस्य दीपक अण्णा पाटील यांनी आभार व्यक्त केले. दरम्यान आजच्या या पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारत कार्यक्रमावर यावल रावेर चे स्थानिक आमदार शिरीष चौधरी आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा .मुकेश येवले यांनी प्रॉटोकॉलचा भंग झाल्यामुळे या संपुर्ण कार्यक्रमावर बहीष्कार टाकण्यात आले होते .

jalgaonsandesh

jalgaonsandesh