सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – येथे गेल्या दोन दिवसांपासून कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे गावात ठिकठिकाणी पाणी भरण्यासाठी महिला गर्दी करताना दिसत आहेत.
येथील गावाला पाणीपुरवठा करणारी पुला जवळील विहिरी वरील विजपंप जळाल्याने गावात पाणीपुरवठा बंद आहे.विशेष म्हणजे सध्या येथे प्रशासक म्हणून भुसावळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उमेश पाटणकर आहेत . सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपला असल्याने आता कोणीही लक्ष द्यायला तयार नाही तसे पाहता ग्रामपंचायतीच्या दोन तीन सदस्यांनी विज पंप जळाला त्या त्या वेळी एकाच दिवसात दुरुस्ती करुन ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत केला आहे मात्र आता सलग तीन चार दिवस नळांना पाणी येणार नाही असे सांगितले जात आहे . त्यामुळे प्रशासक व ग्रामसेवक यांनी लक्ष घालून ताबडतोब पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.