साची येथे कार्तिक पौर्णिमाच्या आंतरराष्ट्रीय महाउत्सवात निंभोरा येथील महिला सहभागी

साची – मध्य प्रदेश मधील विधिशा जिल्ह्यातील साची येथे दरवर्षी प्रमाणे श्रींलंका सरकार व भारत सरकार च्या माध्यमातून कार्तिक पौर्णिमेला भगवान बुध्दाचे निष्ठावंत व अरहंत पदाला पोहचलेले पूज्य भन्ते महामोगलयम व भन्ते सारिपूत यांच्या अस्तीची प्रांपारिक नृत्य करीत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून त्या साची स्तूप येथे आणली जाते. त्यामध्ये मध्यप्रदेश सरकार चा सांस्कृतिक विभाग चांगल्या प्रकारे दोन दिवस गायन व नृत्य चा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करते.

या कार्यक्रमात स्थानिका नागरिकासह देशातून व विदेशातून मोठया प्रमाणात बौद्ध बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी महाराष्ट्र तून सुद्धा कानाकोपरातून बौद्ध बांधव आले होते. त्यामध्ये जळगाव जिल्ह्या मधील भुसावळ तालुक्यातील निभोरा ब्रु ॥ येथील व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून परिसरातील महिला वैशाली सरदार यांनी एकत्रित करून रमाई महिला ग्रुप, निंभोरा ब्रु ॥ स्थापन केला आणि या माध्यमातूनग्रुप ऍडमिन केंद्रीय शिक्षिका वैशाली सरदार यांनी भारतीय बौद्ध महासभा जळगांव पूर्व सहकार्याने यांनी स्वतः पुढाकार घेऊन ना नफा  -ना तोटा या तत्वावर फक्त रेल्वेचे तिकीट चे पैसे घेऊन गरीब हातमजुरी करणाऱ्या महिला या कार्यक्रमांस कधीही जाऊ न शकल्या अशा महिलांना एकत्रित करून त्यांना या इतिहासिककार्यक्रम चे साक्षीदार केले आहे.

यामध्ये प्रज्ञा मेश्राम, निशा वाघ, चंदा खंडारे, रेखा हातोले, वैशाली जामनिक, सुजाता बोदडे, कमला सोनोने, विशाखा सिरसाठ,कुसुम सोनोने, शिला साळवे,लीला चतुर

याच्या सह विशेष सहकार्य त्रिरत्न बुद्ध विहार निंभोरा ब्रु ॥ आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या विशेष सहकार्य ने भारतीय बौद्ध महासभाचे महाराष्ट्र चे संघटक के. वाय. सुरवाडे, निभोरा येथील राहुल वाघ, प्रकाश सरदार, तरुण गवई, प्रणव मेश्राम, सुशील चोपडे, सुमेध चतुर यांनी केले.

ताजा खबरें