नरेंद्र मोदी स्टेडियमचा मान जाणार! भारतात या ठिकाणी बनणार जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम

सध्या जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमधील अहमदाबाद शहरात आहे. या स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी स्टेडियम असून येथे 132,000 लोकं बसण्याची क्षमता आहे. मात्र आता तामिळनाडूमध्ये या स्टेडियमपेक्षाही मोठं स्टेडियम उभारण्यात येणार आहे.

तामिळनाडू सरकारनं कोईम्बतूरमध्ये भारतातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम बांधण्याची योजना आखली आहे.

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमनंतर तामिळनाडूतील हे दुसरं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. स्टेडियम परिसरात क्रिकेटच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी हा उपक्रम आहे. राज्याचे उद्योगमंत्री टीआरबी राजा आणि युवक कल्याण व क्रीडा विकास मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी या प्रकल्पाला उभारी दिली आहे.

हे स्टेडियम राष्ट्रीय महामार्ग 544 वर कोईम्बतूर शहरापासून सुमारे 16 किमी अंतरावर बांधण्यात येईल. स्टेडियममध्ये व्हीआयपी आणि कॉर्पोरेट सुविधा, खेळाडूंसाठी लाउंज, मीडिया सेंटर, सार्वजनिक कॅफेटेरिया, रेस्टॉरंट्स आणि क्रिकेट संग्रहालय यासह अत्याधुनिक सुविधा असतील.

हे स्टेडियम तयार करण्यासाठी चेन्नईचं एमए चिदंबरम स्टेडियम तसेच बेंगळुरूचं एम चिन्नास्वामी स्टेडियम आणि लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमकडून प्रेरणा घेतली जाईल. आता या स्टेडियमचं बांधकाम कधी सुरू होतं आणि ते कधी पूर्ण होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

चेन्नईचं एमए चिदंबरम स्टेडियम, जे ‘चेपॉक’ या नावानं देखील ओळखलं जातं, हे भारतातील सर्वात जुनं क्रिकेट स्टेडियम आहे. हे स्टेडियम 1916 मध्ये बांधण्यात आलं होतं. 1934 मध्ये येथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. हा कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. इंग्लंडनं हा सामना 202 धावांनी जिंकला होता. चेन्नईच्या या स्टेडियममध्ये सुमारे 50,000 लोकं बसण्याची क्षमता आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला