गरिबाच्या घरात काय पोहोचलं तुम्हीच पहा, अंबादास दानवे यांची टीका

लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी अयोध्या नगरी 22.50 लाख दिव्यांनी झगमगली होती. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवे लावण्याचा हा विश्वविक्रम झाला असून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मात्र या झगझमगत्या अयोध्या नगरीच्या व्हिडीओ नंतर आता तेथील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या अयोध्येतील काही गरजू महिला या दिव्यांमध्ये उरलेले तेल डब्ब्यात भरून घेऊन जात आहे.

या व्हिडीओवरून विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. दानवे यांनी अयोध्येतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ”22.50 लाख दिवे लावून विश्वविक्रमाचे इमले वगैरे होत असतील. पण दिव्यातील उरलेले तेल आपल्या लेकीसाठी स्वयंपाक करण्यासाठी नेणारी ही माता उत्तर प्रदेशमधील गरिबीला अधोरेखित करते. मोफत धान्य आणि अजून काय काय फोल आश्वासनं देऊन गेले शेठजी. पण गरीबाच्या घरात काय पोचलं, तुम्हीच पहा योगी आदित्यनाथजी!”, अशी टीका दानवे यांनी केली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh