तुम्ही लग्न कधी करणार? भर सभेत तरुणाने विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींचं भन्नाट उत्तर; म्हणाले.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. राजकीय नेते प्रचारात व्यस्त असून आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सभा, मेळाव्यांचा धडाका पाहायला मिळत आहे.

रायबरेली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात प्रचाराच्यानिमित्ताने राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची एक सभा पार पडली. यावेळी एका युवकाने राहुल गांधी यांना तुम्ही लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधींनी दिलेल्या उत्तराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

रायबरेली लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी सोमवारी निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी त्यांच्याबरोबर प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही स्थानिक नेतेही उपस्थित होते. प्रचाराची सभा झाल्यानंतर राहुल गांधी व्यासपीठावरून निघणार एवढ्यात समोर बसलेल्यांपैकी एका युवकाने तुम्ही लग्न कधी करणार? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारला. मात्र, गर्दी असल्यामुळे व्यासपीठावर राहुल गांधी यांना आवाज आला नाही. मात्र, हा प्रश्न प्रियंका गांधी यांच्या लक्षात आला. यावेळी प्रियंका गांधी यांनी व्यासपीठाच्या समोरून युवकाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह राहुल गांधी यांना केला.

यानंतर राहुल गांधी यांनी व्यासपीठावर असलेल्या नेत्यांना नेमकं प्रश्न काय आहे? याबाबत विचारणा केली. यानंतर त्यांना त्या युवकाने विचारलेला प्रश्न व्यासपीठावरील नेत्यांनी सांगितला. यानंतर राहुल गांधी यांनी प्रश्न विचारणाऱ्या युवाकाचा मान राखत उत्तर दिलं. ते म्हणाले, ‘आता लवकरच लग्न करावं लागेल’. राहुल गांधी यांनी दिलेल्या या उत्तरानंतर व्यासपीठावर आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.

राहुल गांधींना याआधीही विचारला होता प्रश्न

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु होती. तेव्हा सहा वर्षांच्या मुलाने राहुल गांधींना विचारलं होतं की तुम्ही लग्न कधी करणार? त्यावर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं होतं. राहुल गांधी यांना या मुलाचा प्रश्न ऐकून आश्चर्यही वाटलं होतं. राहुल गांधी यांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावरही पोस्ट केला होता. तेव्हा राहुल गांधी म्हणाले होते की, ‘लग्न बघू…सध्या तर मी काम करतोय. काम संपलं की विचार करु.’

jalgaonsandesh

jalgaonsandesh