दहावीनंतर काय करू? दोन लाख विद्यार्थ्यांची होणार ॲप्टिट्यूड टेस्ट! शालेय शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई – करिअरच्या उंबरठ्यावर असलेल्या नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांची आवड, कल, क्षमता विचारात घेऊन त्यांचे समुपदेशन करणारी, गरज भासल्यास शास्त्रीय कसोट्यांवर आधारित ॲप्टिट्यूड टेस्ट (अभियोग्यता चाचणी) घेऊन त्यांचा शाखा, विषय निवडीचा मार्ग सुकर करण्याची योजना शालेय शिक्षण विभागाने आखली आहे.

२०२३-२४ मध्ये परीक्षा देणाऱ्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून करिअर निवडीविषयी गोंधळ असलेल्या निवडक दोन लाख विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेण्याची योजना आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना विभागाचे प्रशिक्षित समुपदेशक शिक्षक आणि ॲपच्या मदतीने करिअर निवडीबाबत मार्गदर्शन केले जाईल.

गेली ६० वर्षे हे काम विभागाच्या व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्थेमार्फत (आयव्हीजीएस) होत होते. राज्यात नऊ ठिकाणी या संस्थेमार्फत कोणत्याही आर्थिक मोबदल्याविना विद्यार्थ्यांना करिअरविषयक समुपदेशन करून घेता येई; परंतु २०१७ साली ही संस्था मोडीत काढून एका खासगी संस्थेमार्फत दहावीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांची ३०-४० ढोबळ प्रश्नांवर आधारलेली कलचाचणी घेऊन त्याचा अहवाल निकालासमवेत देण्याचा घाट विभागाने घातला. ही कलचाचणी सदोष असल्याचे आक्षेप घेतले गेल्याने २०१९ मध्ये ती गुंडाळावी लागली.

सद्य:स्थितीत विद्यार्थ्यांना शास्त्रीय कसोट्यांवर आधारित ॲप्टिट्यूड टेस्ट देण्याची कोणतीही मोफत वा स्वस्त सुविधा सरकारी पातळीवर उपलब्ध नाही. खासगी शाळा अथवा संस्थांमार्फत भरपूर पैसे मोजून विद्यार्थाचे करिअर कौन्सिलिंग केले जाते; पण सरकारी शाळा किंवा तळागाळातील सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांकडे अशी कोणतीही सोय नव्हती. ही कमतरता शालेय शिक्षण विभागाच्या नव्या योजनेमुळे भरून निघेल अशी अपेक्षा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचे करिअरविषयक समुपदेशन केले जाई, तसेच ज्यांना गरज असेल त्यांची शास्त्रीय कसोट्यांवर आधारलेली ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (एससीईआरटी) सूत्रांनी दिली.

अशी असेल नवी समुपदेशन सुविधा

विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व, आवड, क्षमता, कल, समायोजन याचा विचार करून ही चाचणी घेतली जाईल. दहावी परीक्षेच्या आधी किंवा नंतर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. सरसकट सर्व विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूट टेस्ट घेतली जाणार नाही. करिअरच्या बाबतीत गोंधळलेल्या ज्या विद्यार्थ्यांची समुपदेशक शिफारस करेल, केवळ त्यांचीच चाचणी होईल.

कोविडनंतर शालेय शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या समुपदेशन सेवेत खंड पडला होता; परंतु आता आपण ती पुन्हा सुरू करत आहोत. त्याकरिता ४० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापैकी २७ हजार शिक्षकांचे प्रशिक्षण ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. निवडक दोन लाख विद्यार्थ्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट घेतली जाईल. – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला