मंत्रालयाच्या आवारात रिल्सवर बंदी; फोटोसेशन करणाऱ्यांवरही वॉच

जामिनावर सुटलेला पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळचे मंत्रालयात तयार केलेले रिल समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदम सावध पवित्रा घेतला आहे. अशा रिल्समुळे सरकार अडचणीत येत असल्यामुळे मंत्रालयात रिल्स तयार करण्यावर पोलिसांनी तातडीने बंदी आणली आहे. मंत्रालयाच्या इमारतीत फोटो काढणाऱयांवरही पोलिसांनी वॉच ठेवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱया गुडांचे फोटो दररोज ट्विट करण्यास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाबे दणाणले आहे.

मंत्रालयात साथीदारांसोबत फिरतानाचे गुंड नीलेश घायवळने रिल तयार केले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुंड नीलेश घायवळचे रिल्स माध्यमांसमोर आणले होते. राज्यातील शिंदे-फडणवीस यांचे महायुतीचे सरकार गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने गुंड मंत्रालयात बिनधास्त फिरतात. मंत्रालयात रिल्स तयार करतात. गुंडांना राजाश्रय मिळत असल्याची सरकारवर टीका सुरू झाली आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या आवारात कोणालाही रिल्स तयार करू देऊ नका अशा तोंडी सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी मंत्रालयात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना दिल्या आहेत. मंत्रालयात आल्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांच्या दालनासमोर फोटो आणि सेल्फी काढण्याकडे अनेकांचा कल असतो. पोलीस आता अशा हौशी कार्यकर्त्यांवरही लक्ष ठेवणार आहेत. मंत्रालयाच्या इमारतीमधील त्रिमूर्ती चौकात आणि या चौकातील वाघाच्या पुतळय़ाजवळ अनेक जण फोटो काढत असतात. या सर्वांवर पोलिसांचा आता वॉच असणार आहे.

मंत्रालयात तयार केलेले गुंडाचे रिल गाजत असताना आज एका आमदाराचे रिल्स कार्यकर्त्यांनी तयार केले. हे आमदार कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयाच्या बाहेर पडत असताना समोरील कार्यकर्ता मोबाईलमधून चित्रीकरण करीत होता. पण या आमदारांना हटकण्याची बंदोबस्तावरील पोलिसांची हिंमत झाली नाही.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला