५ वी पासून व्यवसायाभिमुख शिक्षण असलेल्या अभ्यासक्रमाचा समावेश करावा -अॅड. संजू शिरोडकर

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना दिलं निवेदन

महाराष्ट्र – येत्या नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये ५ वीच्या वर्गापासून व्यवसायाभिमुख शिक्षण असलेल्या विषयाचा अभ्यासक्रमामध्ये येत्या जून पासून सुरु होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षांच्या शिक्षण अभ्यासक्रमामध्ये जपानच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये ५वी पासून व्यवसायाभिमुख शिक्षण असलेल्या अभ्यासक्रमाचा समावेश करावा. जेणेकरुन लहान वयामध्येच तरुण-तरुणींना विविध उद्योग व्यवसायाबाबत माहिती तसेच ज्ञान प्राप्त होऊन नविन व्यवसायाच्या संधी विद्यार्थ्यांना भविष्यात प्राप्त होतील. सध्या नोकरीच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात नोकरीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यासाठी आतापासूनच उद्योग व्यवसाय शिक्षण तसेच प्रशिक्षण ५ वी पासूनच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्यास नवीन उद्योजक निर्माण होण्यास मोठा हातभार लागेल. असे निवेदन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना अॅड. संजू शिरोडकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .