ममुराबाद – (प्रतिनीधी ) ममुराबाद ग्रामपंचायतीचे पदाधिकारी त्याच प्रमाणे ग्रामविकास अधिकारी यांनी १५ वा वित्त आयोगाच्या निधी खर्च करतांना कोणत्याच प्रकारचे नियोजन न करता वित्त आयोगाच्या निधीची एक प्रकारे उधळपट्टी लावलेल आहे. गावात वेगवेगळ्या वार्डमध्ये वित्त आयोगाच्या निधीमधुन गटारीचे कामे सुरू आहेत गटारीचे सांडपाणी गावाच्या बाहेर निघायला मोठ्या गटारी नसल्यामुळे गावातील सर्वच वॉर्डाच्या गटारी पूर्णपणे गाळाने भरल्या आहे. गटारीचे घाण पाणी रस्त्यावर येत असताना देखील ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य त्याचप्रमाणे ग्राम विकास अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केलेले आहे . बऱ्याच ठिकाणी होत असलेल्या गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबतची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देऊन सुद्धा आज पर्यंत जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या कोणत्याच अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कामाची पाहणी देखील केलेली नाही. गावामध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी करायला बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना गावातील नागरिकांनी बऱ्याच वेळेस फोनवरून कळविले असताना देखील आजपर्यंत संबंधितांनी कामाच्या ठिकाणी भेट दिलेली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
बेजबाबदार ग्राम विकास अधिकारी
वार्ड नंबर तीन मध्ये वित्त आयोगातून गटारीचे काम सुरू करण्यात आले मात्र ज्या गटारीचे काम सुरू केले त्या गटारीचे पाणी निघायला पुढील गटारी पूर्णपणे गाळाने भरलेल्या आहेत याबाबत ग्राम विकास अधिकारी कैलास देसले यांना वेळोवेळी गटारी साफसफाई करण्याबाबत वार्डातील नागरिकांनी विनंती करून देखील बेजबाबदार ग्राम विकास अधिकारी यांनी मात्र कोणाचेच न ऐकता आपल्या कर्तव्यात कसूर केलेला आहे.
वार्ड नंबर तीन ची गटार ठरत आहे वादग्रस्त
गटारीचे काम वार्ड नंबर तीन मधील पुंडलिक धनगर यांचे घरापासून सुरू केले मात्र गटारीचे काम पूर्ण रस्त्यात होत असल्याची तक्रार येथील रहिवासी गजानन भादू पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे केलेली आहे. सदर गटार रस्त्यामध्ये घेतल्याने गटारीच्या मागील बाजूस असणाऱ्या रहिवाशाला अतिक्रमणास वाव मिळेल तसेच गटार घराच्या समोर आल्याने व एक गटार गजानन पाटील यांचे पायरी जवळून गेल्याने त्यांच्या व तेथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने गटारीचे काम त्वरित थांबवण्यात यावे असे देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.वार्ड नंबर तीन मधील गटारीच्या वारंवार तक्रारी करून देखील ग्रामपंचायतच्या मुजोर पदाधिकारी तसेच बेजबाबदार ग्रामविकास अधिकारी यांनी मात्र नित्कृष्ट काम करून आपला स्वतःचा स्वार्थ साधता यावा त्यामुळे ग्रामस्थांच्या तक्रारीकडे संबंधितांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे.या गटारीच्या प्रकरणांमध्ये वरिष्ठ कार्यालयाकडून लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा व सदर होत असलेल्या गटारीचे काम बंद करावे अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.