विदगाव येथे तिसर्यांनदा कोविशिल्ड च्या ३०३ डोसचे लसिकरण …

विशाल सोनवणे

जळगाव – तालुक्यातील विदगाव येथे आज दिनांक 18 रोजी  kovidshild साठी तिसऱ्यांदा 303 लसीचे चे नियोजन केलेले असून विदगाव येथील सरपंच सौ प्रतिभा भगवान कोळी यांनी दुसरी लस घेतली.. विदगाव येथे जवळपास 75 ते 80 टक्के लसीकरण पूर्ण झाले त्याबद्दल नागरिकांनी पंचायत समिती सभापती सौ ललिता जनार्दन कोळी यांचे आभार व्यक्त केले . आणि लवकरात लवकर लस उपलब्ध करून  योग्य नियोजना बाबत सरपंच यांचे देखील आभार मानले. आम्ही लवकरात लवकर 100% गाव लसीकरण झालेले असेल याबाबत प्रयत्नशील राहू अशी ग्वाही सरपंच आणि सभापती यांनी विदगाव येथील नागरिकांना केले. गावातील लोकांच्या सहकार्याने व शांततेमुळे हे सर्व शक्य आहे म्हणून सरपंच सौ प्रतिभा भगवान कोळी यांनी ग्रामस्थांचे आभार मानले. आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी देखील विदगाव गावाचे कौतुक व्यक्त करून आभार व्यक्त केले.त्याप्रसंगी येथील माजी उपसभापती प्रशांत अरविंद पाटील (बंडूभाऊ), सभापती यांचे पती श्री जनार्दन भावलाल कोळी, निलेश सपकाळे ,विशाल सोनवणे, भगवान भाऊ यांचे सहकार्य लाभले.