पैशांचा महापूर! कालव्यात वाहून आले चलनी नोटांचे बंडल, गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड, पहा video 

बिहारमधील रोहतास जिल्ह्यात एक अजब प्रकार पाहावयास मिळाला. मुफस्सिल पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरादाबाद गावातील कालव्यामध्ये चलनी नोटांचे बंडल वाहून आले. याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि नोटांची बंडलं गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. लोकं थेट कालव्याच्या पाण्यात उतरले आणि नोटांची बंडलं गोळा करून पळू लागली. ही नोटांची बंडलं 10, 100, 500 आणि 2000 रुपयांची असल्याची माहिती मिळत असून याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास कालव्यातील पाण्यात नोटांची बंडलं वाहून आल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. याची माहिती मिळताच नोटा गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. पाण्यावर तरंगणारी नोटांची बंडलं लुटण्यासाठी लोकं पाण्यात उतरली. नोटा लुटण्याचा व्हिडीओही व्हायरल होत असून याची माहिती मिळताच मुफस्सिल पोलीस स्थानकाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.

मुरादाबात पुलाजवळ गोंधळ झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र येथे आम्हाला नोटांची बंडलं आढळली नाहीत. लोकांनी अफवा पसरवली असावी. याचा तपास सुरू असून पोलीस सर्व अंगांनी चौकशी करत आहेत, असे मुफस्सिल पोलीस स्थानकाचे अधिकारी रिझवान खान यांनी सांगितले.

दरम्यान, ही नोटांची बंडलं नक्की कुठून आली? या नोटा खऱ्या की खोट्या? याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पोलीस अधिकारी आणि जिल्हा प्रशासन याचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे हे चोरीचे किंवा काळ्या मार्गाने जमा केलेले पैसे असावे आणि तपास यंत्रणांचे छापे टाळण्यासाठी कालव्यात फेकून दिले असावे अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.

अक्षय कुमार नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, कोचिंग क्लासला जात असताना मुलांना कालव्यामध्ये लोकांची गर्दी दिली. चौकशीनंतर कालव्यात नोटा वाहून आल्याचे कळाले. लोकं कालव्यात उतरून नोटा गोळ करत होते. मात्र क्लासला उशीर होत असल्याने आम्ही तिथून निघून गेलो.

jalgaonsandesh

jalgaonsandesh