टोमॅटोच्या सुरक्षेसाठी ठेवले बाऊन्सर, भाजीविक्रेत्याने लढवली अनोखी शक्कल

टोमॅटो आता दीडशे रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. टोमॅटो खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक दुकानदारांशी हुज्जत घालत आहेत. रोजच्या वादाला कंटाळलेल्या वाराणसीमधील भाजीविव्रेत्याने चक्क आपल्या दुकानावर बाऊन्सर तैनात केलेत.

वाराणसीच्या लंका भागात अजय फौजी या भाजीविव्रेत्याचे दुकान आहे. वाढलेल्या दरांवरून ग्राहकांनी बाचाबाची करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी गणवेशधारी बाऊन्सर तैनात केले. याबाबत अजय फौजी म्हणाले, टोमॅटोचे दर शंभरच्या पुढे गेले हे ग्राहकांना पटतच नाहीत. त्यांच्यात आणि आम्हा दुकानदारांमध्ये यावरून भांडण होते. ही रोजची भांडणे नकोशी झाली होती. म्हणून मी शेवटी दुकानावर बाऊन्सर तैनात केले.

दर कमी होणार, टोमॅटोची खरेदी आता नाफेड, एनसीसीएफ करणार

कुठे मुसळधार पाऊस तर कुठे पावसाने ओढ दिल्यामुळे टोमॅटो पिकाचे उत्पादन घटले. त्यामुळे देशभरात टोमॅटोचे दर 100 ते 200 रुपये किलोपर्यंत भडकले. आता ही दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटो खरेदी करणार आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर लवकरच कमी होतील.

ताजा खबरें