भावाच्या आत्महत्येसाठी वहिनीला धरले जबाबदार, दीराने पेट्रोल टाकून जीवंत जाळले

मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये एका मोठ्या दीराने वहिनीला जिवंत जाळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून मृतदेह शवविच्छेनदासाठी पाठवला आहे.

निर्मला बलई असे या महिलेचे नाव असून आरोपीचे दीराचे नाव सुरेश आहे. निर्मला आपल्या दोन मुलांसह सासरच्या घरी राहत होती. तिचा पती प्रकाश यांनी सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यासाठी वहिनीच जबाबदार असल्याचा राग होता. तिचा सूड उगवण्यासाठी सुरेशने निर्मलाची हत्या केल्याचे बोलले जात आहे. आपल्या धाकट्या भावाच्या आत्महत्येसाठी तो निर्मलाला जबाबदार धरायचा. भावाच्या आत्महत्येसाठी वहिनीच जबाबदार असल्यावरुन शनिवारी घरात वाद झाला, त्यानंतर दीराने भावजयीला बेदम मारहाण केली.एवढ्यावरच न थांबता त्याने तिला घराबाहेर ओढून तिच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. या घटनेत महिला गंभीर भाजली असून तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी सुरेशने घटनेबाबत तिच्या भावाला फोन करुन सांगितले.

निर्मलाच्या भावाने सांगितले की, आम्हाला सुरेशचा फोन केला होता की, तुझ्या बहिणीला मी जीवंत जाळले आहे. सुरेशने भावाच्या मृत्यूसाठी माझ्या बहिणीला जबाबदार धरले. पुढे तो म्हणाला, तो निर्मलाला अनेक दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी देत होता.आज मी तिच्या घरी जाऊन तिला आणणार होतो, तेव्हा त्याने आम्हाला फोन करून तिची हत्या केल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली.

ताजा खबरें