वडती तालुका चोपडा येथील प्रा दीनानाथ रघुनाथ पाठक यांना पीएचडी प्रदान       

हेमकांत गायकवाड

चोपडा : वडती तालुका चोपडा या लहानश्या खेड्यातील प्रा.दीनानाथ रघुनाथ पाठक यांना कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्यामार्फत मराठी विषयात विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी पदवी नोटिफिकेशन प्रदान करण्यात आली.

विद्यापीठात झालेल्या छोटेखांनी कार्यक्रमात प्रभारी कुलगुरू प्रो. बी व्ही पवार यांच्या हस्ते पीएचडी चे नोटिफिकेशन देण्यात आले. त्याप्रसंगी कुलसचिव प्रो .आर एल शिंदे, मार्गदर्शक डॉ किशोर सोनवणे, नाहाटा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ ए.डी .गोस्वामी हे उपस्थित होते. प्रा दीनानाथ पाठक यांना प्रा डॉ किशोर सोनवणे कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा तसेच डॉ विद्या व्यवहारे पाटील , प्रा .डॉ किशोर पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.ते आदर्श शिक्षक रघुनाथ नथू पाठक वडती यांचे लहान चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.मोहनभाऊ फालक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मीनाक्षी वायकोळे महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले आहे .त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh