वाळकी-मालखेडा शेत शिवारात अफूची लागवड.. जिल्हा पोलिस अधीक्षकांसह पोलिस ताफा शेतात दाखल.. 

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

चोपडा-तालुक्यातील घोडगाव शिवारात १ हेक्टर ३० आर म्हणजे तब्बल तीन एकर शेती क्षेत्रात अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दि. 3 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आले आहे. या अफूची किंमत करोडो रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तविला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील वाळकी शिवारातील शेतकरी प्रकाश सुधाकर पाटील यांच्या मालकीच्या घोडगाव शिवारातील शेतात तब्बल १ हेक्टर ३० आर म्हणजे तीन एकर क्षेत्रात अफूच्या झांडाची लागवड करण्यात आली असल्याची गोपनिय माहिती चोपड़ा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक देविदास कुनगर यांना मिळाली होती, त्यानुसार पोलिस निरीक्षक देविदास कुनगर यांनी प्रभारी नायब तहसिलदार देवेंद्र नेतकर, पोउनि अमरसिंग वसावे, पो.कॉ. सुनिल जाधव, सुनिल कोळी, राजु महाजन, भरत नाईक, शशिकांत पारधी, लक्ष्मण शिंगाने इत्यादी पोलिस कर्मचारी पथकासह घटनास्थळी गेले असता तीन एकर क्षेत्रात अफूच्या झाडाची लागवड करण्यात आल्याचे निदर्शनास आले, यावेळी कृषी अधिकारी प्रशांत देसाई यांनाही घटनेची माहिती कळवून बोलविण्यात आले होते. घटनास्थळी पोहचत संबंधित अधिकाऱ्यांचा दिवसभर पंचनामा सुरु होता. या अफूच्या झाडांची प्राथमिक किंमत अंदाजे कोट्यावधींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस विभागाच्या या मोठ्या कारवाईमुळे अफू लागवड करणाऱ्यांचे धाबे दणादणले आहे. अशाप्रकारची लागवड या परिसरात अन्य कुठे करण्यात आली आहे का? याचा देखील तपास पेलिस विभागातर्फे करण येत आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळब उडाली आहे.

घटनास्थळी जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी भेट दिली असून त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सदर अफूची शेती साधारणत तीन एकर वर दिसून येत आहे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कूनगर यांना सदर अफूच्या शेतीच्या संदर्भातील माहिती मिळाली होती. त्यानुसार ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. शेतकरी प्रकाश पाटील याने प्रतिबंधित अफूची शेतीची लागवड केली असून त्यामुळे सदर शेतकऱ्यावर उचित प्रकारे योग्य ती कारवाई केली जाईल आणि सदर कारवाई करणे सुरू झाले असून लवकरात लवकर अजून इतरत्र कुठे अफूची लागवड आहे का ? याचा शोध घेण्यात येईल. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यात अफूची शेती कोणी केले असल्याचे निदर्शनास आलेले नाही सदर अफूची एकूण किंमत नेमके त्याच्या वापरावर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले .अंदाजीत अफूची किंमत कोट्यवधींच्या घरात बोलले जात आहे. सदर कारवाईने संपूर्ण जिल्ह्यासह खानदेशात अफू व गांजा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सदर कारवाईच्या वेळेस घटनास्थळी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनकर, प्रभारी तहसीलदार देवेंद्र नेतकर, मंडळ अधिकारी आर आर महाजन, तलाठी एस एस महाजन, पंच एन एस धनराळे व आसिफ शेख आदी उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या