वाद वाढणार! OBC समाजही रस्त्यावर उतरला; पुण्यात मराठा आरक्षणाबाबत काढलेला GR जाळला

पुणे – ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात आरक्षणाचा वाद पेटणार आहे. राज्य सरकार विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला असून थेट रस्त्यावर उतरुन आपला संताप व्यक्त केला आहे.

पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांची मागणी पूर्ण करत सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.

सरकारने काढलेला जीआरचा ओबीसी कार्यकर्त्यांनी जाळून निषेध व्यक्त केला आहे. मराठा कुणबी, कुणबी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने तयार केलेल्या मसुद्याची प्रत ओबीसी कार्यकर्त्यांनी जाळली. सगे सोयरे शब्दाचा समावेश या अध्यादेशात करण्याचं प्रस्तावित आहे. त्याला ओबीसींकडून विरोध होत आहे. सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी पुण्यातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर ओबीसी कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. त्यांनी आज अध्यादेशाच्या मसुद्याचं दहन केलं.

…तर ओबीसींचं 27% आरक्षण रद्द करणार – मनोज जरांगे यांचा इशारा

मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाल विरोध करत असाल तर ओबीसींचं 27% आरक्षण रद्द करणार असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. मंडल आयोग आम्ही स्वीकारलेला नाही. मात्र मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं करत असाल तर मग त्यालाही आव्हान देण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. मंत्री छगन भुजबळ जर मराठा आरक्षणाला आव्हान देत असतील तर आम्हीही ओबीसींना आव्हान देऊ असा जाहीर इशारा जरांगेंनी दिलाय..

आपली शपथ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ओबीसींना पायदळी तुडवलं – विजय वडेट्टीवार 

आपली शपथ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ओबीसींना पायदळी तुडवलं, अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलीय.. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये चर्चा न करता जीआर काढला. सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे, असंही ते म्हणाले. ओबीसींवरील अन्यायाच्या विरोधात येत्या 5 फेब्रुवारीपासून ओबीसी नेते चैत्यभूमीपासून शक्तिप्रदर्शनाला सुरूवात करणार आहेत. तसंच संभाजीनगरला 20 फेब्रुवारीला ओबीसींची विराट सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

मराठा समाजाचं सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीनं सुरु असल्याचा छगन भुजबळ यांचा आरोप

मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या जीआरचा मसुदा तयार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमच्या चर्चा केली नसल्याचा आरोप ओबीसी नेते आणि अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळांनी केलाय. तसंच मराठा समाजाचं सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीनं सुरू असल्याचा आरोपही भुजबळांनी केला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने