उर्वशी रौतेलाला फोन परत मिळणार; पण चोराने केली ‘ही’ डिमांड

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिचा हरविलेला फोन अखेर मिळाला आहे. यासंदर्भात उर्वशी रौतेलाने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. उर्वशी रौतेला ही भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना पाहण्यासाठी शनिवारी (14 ऑक्टोबर) गुजरातच्या अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गेले होती.

त्यावेळी उर्वशी रौतेलाचा 24 कॅरेट सोन्याचा आयफोन हरविला होता. यानंतर उर्वशी रौतेलाने पोलिसांत फोन हरविल्याची तक्रार केली होती.

यानंतर आता उर्वशी रौतेलाचा आयफोन मिळाल्याची माहिती इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये सांगितले आहे. यानंतर आता उर्वशी रौतेलाचा फोन मिळाल्याचे माहिती तिने तिच्या इन्स्टाग्रामवर दिली आहे. आता उर्वशी रौतेला फोन चोरी करणाऱ्याने मेल केला आहे. यात फोन परत हवा असेल तर चोराने काही डिमांड तिच्यासमोर ठेवल्या आहेत. या डिमांड पूर्ण केल्यानंतर फोन परत करणार असल्याचे चोराने मेलमध्ये सांगितले आहे.

चोराने मेलमध्ये नेमके काय म्हटले

चोराने उर्वशी रौतेलाला Groww Traders या नावाने मेल केला असून या मेलाच स्क्रीनशॉट तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या मेलमध्ये म्हटले की, “तुमचा फोन हा माझ्याकडे आहे. तुला तुझा फोन परत हवा असेल, तर तुम्हाला माझी मदत करावी लागेल. ती म्हणजे माझ्या भावाला कॅन्सर झाला आणि तू त्यांची मदत कर”, असे चोराने मेलमध्ये लिहिले आहे.

 

ताजा खबरें