उनपदेव तीर्थक्षेत्र चा होणार जिर्णोद्धार …

चोपडा प्रतिनिधी (महेश गायकवाड)

अडावद ता. -विविध विकास कामांसाठी चार कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. यात उनपदेव या तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकासाच्या दृष्टीने परिसरातील मंदिरे, स्नानकुंड, इमारतींचे नूतनीकरण, निसर्ग परिचर केंद्र, नावीन्यपूर्ण पॅगोडेसह सेल्फी पॉईन्ट अनेक सुविधा निर्माण करण्याकरिता पर्यटकांसाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

चोपडा तालुक्यातील अडावद जवळील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी प्रभू श्री रामचंद्र यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेल्या पवित्र तीर्थक्षेत्र उनपदेव येथे आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याने पर्यटन विकास व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या माध्यमातून विविध विकासकामे मंजूर करण्यात आली.

या तीर्थक्षेत्रावर सातपुड्याच्या यावल अभयारण्यातील पर्यटकांसाठी विविध सुविधा व्हाव्या म्हणून चोपडा विधानसभेच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. तीर्थक्षेत्रासाठी चार कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मिळवून घेतला. यासंदर्भात शासन निर्णय नुकताच जाहीर झाला असून या निधीतून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. यामुळे या तीर्थक्षेत्राचा अधिक विकास होणार असून उनपदेव येथे येणाऱ्या भाविकांसह पर्यटकांना पर्यटनाचा आनंद देखील आता मिळू शकणार आहे. अडावदच्या उत्तरेस सातपुडा पर्वताच्या कुशीत प्रभू श्रीरामचंद्र, सितामाई व लक्ष्मण यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत उनपदेव हे तीर्थक्षेत्र व पर्यटनक्षेत्र आहे.

पर्यटन विकास असा..

श्रीतीर्थक्षेत्र उनपदेव क्षेत्र येथे श्रीरामचंद्रांनी बाण मारलेल्या जागी गरम पाण्याचा झरा अनादिकालापासून वाहत आहे. त्यासभोवती पर्यटकांना स्नानकुंड बांधण्यात आले आहे. ते फार जुने झाले आहे त्याचे संपूर्ण नूतनीकरण आधुनिक पद्धतीने शिवकालीन पद्धतीचे तयार करण्यात येणार आहे. सभोवती मंदिर व धर्मशाळेचे नुतनीकरण होणार आहे. तसेच पर्यटक आनंदायक वातावरण निर्मितीसाठी सर्व बगीच्यांना विकसित करण्यात येणार आहे. त्याठिकाणी पर्यटकांसाठी नावीन्यपूर्ण पॅगोडे तयार केले जाणार आहेत. तसेच निसर्ग परिचर केंद्राचे नूतनीकरण, संपूर्ण परिसरात सोलर विजेवर विद्युत रोषणाई करणे, संपूर्ण परिसरास रंगरंगोटी करणे, पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी टाकी तसेच स्वच्छतेच्या सोयी निर्माण करणे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अशा विविध सुविधांची निर्मितीसाठी बऱ्याच वर्षांनंतर निधी उपलब्ध होत असल्याने एका पौराणिक, ऐतिहासिक, व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या श्रीतीर्थक्ष्रेत्र उनपदेवचा कायापालट होणार आहे.

मुख्य आकर्षण सातपुडा हा आदिवासी संस्कृती जपणारा पर्वत आहे. त्यातील आदिवासींची जीवनशैली , सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणारे मुझियमची निर्मिती याठिकाणी होणार आहे.

मिनीरेल्वे ट्रॅक दुरुस्ती

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून श्रीतीर्थक्षेत्र उनपदेव हे पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी चार कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून रेल्वे ट्रॅक नूतनीकरण करण्यात येणार आहे. या ठिकाणी असलेली मिनी रेल्वे पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होती मात्र निधी अभावी ती बंद अवस्थेत पडलेली आहे ती दुरुस्त व्हावी अशी अपेक्षा होती. ती आता पूर्ण होत उनपदेव हे तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी आपण पाठपुरावा करीत होतो. असे आमदार सोनवणे यांनी सांगितले.

आमदार लताताई सोनवणे,प्रा चंद्रकांत सोनवणे माजी आमदार यांचे सौ भावनाताई माळी लोक नियुक्त सरपंच अडावद,सौ भारतीताई महाजन उपसरपंच अडावद, संजीव शिरसाठ आदिवासी समाज सेवक,समस्थ सातपुडातील आदिवासी समाज व समस्थ शिवसैनिक यांनी आभार मानले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी