प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव व गोजोरा आणि वराडसिम येथे ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवडणूक पार पडली .सुनसगाव येथील उपसरपंच पदासाठी निवडणूकीसाठी वैशाली युवराज पाटील होणार हे निश्चित झाले होते त्यांच्या कडे पाच उमेदवार होते आणि एक मत त्यांना मिळणारच होते मात्र ऐनवेळी मतदानाची शाळा फिरली आणि अनपेक्षित उपसरपंच पदाचा निकाल लागला . सुनसगाव येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच काजल भोजराज कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली त्या अगोदर एकनाथ सपकाळे व वैशाली पाटील यांनी प्रत्येकी दोन अर्ज घेतले आणि एक एक अर्ज दाखल केला माघारीच्या वेळात कोणीही माघार घेतली नाही त्यामुळे गुप्त मतदान घेण्यात आले त्यात एकनाथ फुलसिंग सपकाळे यांना सहा तर वैशाली युवराज पाटील यांना चार मते मिळाली त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्री एस डी पाटील यांनी एकनाथ सपकाळे यांना विजयी घोषित केले निवडणूक कामी ग्रामसेविका प्रतिभा रमेश तायडे यांनी सहकार्य केले .
गोजोरे येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच सौ नंदा लक्ष्मण कोळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली त्यात चंद्रकांत सोपान पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने चंद्रकांत पाटील यांची गोजोरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली .
वराडसिम येथील ग्रामपंचायत कार्यालयात नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच निलप्रभा उमेश पाचपांडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली यावेळी येथे मोठ्या प्रमाणात रस्सीखेच पाहायला मिळाली त्यात विलास रामदास पाटील व विजय रविंद्र पाटील यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते माघारीच्या वेळात कोणीही माघार घेतली नाही त्यामुळे मतदान झाले असता १४ पैकी १ मत बाद झाले तर विजय रविंद्र पाटील यांना सात तर विलास पाटील यांना सहा मते मिळाली त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजय रविंद्र पाटील यांना उपसरपंच पदासाठी विजयी घोषित केले . उपसरपंच निवडणूकीसाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पो नि बबनराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कुऱ्हा पानाचे औट पोष्ट चे पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक शांततेत पार पडली गोजोरे येथे चंद्रकांत सोपान पाटील यांची उपसरपंच पदासाठी वर्णी लागणार हे दै देशदूत चे भाकित खरे ठरले तर सुनसगाव येथे ऐनवेळी मतदार सदस्यांनी निर्णय बदलविल्याने उपसरपंच पदासाठी एकनाथ सपकाळे यांची वर्णी लागली आहे.