महाराजस्वं अभियान अंतर्गत कोळी विद्यार्थ्यांना एसटीचे दाखले मिळावेत यासाठी ठिय्या आंदोलन व अन्नत्याग सत्याग्रह.. जगन्नाथ बाविस्कर.

चोपडा – तालुका विधानसभा मतदारसंघ हा सन २००९ पासून अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव करण्यात आलेला आहे. कारण ह्या मतदारसंघात आदिवासीबहुल लोकसंख्येपैकी ७० टक्के लोकसंख्या व मतदारसंख्या एकट्या कोळी जमातीची आहे. परंतु अजूनही येथील आदिवासी कोळी जमातीला टोकरेकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासनदरबारी भटकंती करावी लागत आहे.

संबंधित विभागातर्फे कोळी जमातीवर हेतुपुरस्संर अन्याय केला जात आहे. यापुर्वी अमळनेर प्रांत कार्यालयाकडुन तसे शेकडों दाखले दिलेले आहेत. मग आता का देण्यात येत नाहित ? हा प्रश्नही सध्या एैरणीवर आहे. याप्रसंगी कोळी जमातीच्या न्याय व हक्कांच्या मागण्या पुढीलप्रमाणे असतील.

१) चोपडा (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातील ज्या कोळी लोकांचे जातप्रमाणपत्रासाठीचे अर्ज संबंधित विभागाकडे प्रलंबित असतील त्यांना तात्काळ टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत.

२) आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत येणारी कोळ्यांची गावे व त्याव्यतिरिक्त इतरही ज्या कोळी गावात ठक्करबाप्पा योजना व शबरी घरकुल योजना राबवली असेल अशा गावातील कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळावेत.

३) ज्या कोळी लोकांची ग्रा.पं. कुटुंब पत्रकात अनु. जमाती अशी नोंद आहे त्यांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत.

४) कोळी समाजातील ज्या मुलामुलींची शालेय लि.स.रजिष्टरवर टोकरेकोळी अशी नोंद आहे त्यांना “महाराजस्व अभियान / शासन आपल्या दारी” अंतर्गत टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत.

५) महसूल विभागाच्या ७अ व ७/१२ खाते उताऱ्यावर ज्या कोळी लोकांची आदिवासी ३६ व ३६ अ ची नोंद आहे त्यांना टोकरेकोळी (एसटी) चा दाखला मिळाला पाहिजे.

६) अजूनही ज्या कोळी लोकांच्या जमिनीवर आदिवासी ३६ व ३६ अ ची नोंद झालेली नाही त्यांच्या ७ अ व ७/१२ खातेउताऱ्यावर तशी नोंद होऊन त्यांनाही टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत.

७) यापुढेही फक्त कोळी नोंद असलेल्या दोन-चार पुराव्यांच्या आधारावरच कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चा दाखला मिळाला पाहिजे.

८) याआधी ज्या कोळी लोकांना प्रांत कार्यालयाकडून टोकरेकोळी (एसटी) चा दाखला दिला असेल त्यांना तो दाखला केंद्रीय (सी) फॉर्म मध्ये वर्ग करून मिळावा, तसेच त्यांच्या परिवारातील इतरही सदस्यांना त्याच दाखल्याच्या आधारावर टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळावेत.

वरिलप्रमाणे न्याय व हक्कांच्या मागण्यांसाठी कोळी लोकांतर्फे आदिवासी दिन व क्रांती दिनानिमीत्त दि. ९ ऑगस्ट २०२३ (वार- बुधवार) रोजी स.११ वाजेपासुन मागण्या मान्य होईपर्यंत चोपडा प्रांत कार्यालयासमोर तीव्र अन्नत्याग सत्याग्रह/ ठिय्या आंदोलन / लाक्षणीक उपोषण/ धरणे आंदोलन/ जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची असेल.आदिवासी कोळी लोकांनी जास्तीतजास्त संख्येने ह्या सत्याग्रहात व ठिय्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन चोपडा म.वाल्मिकी समाज मंडळातर्फे तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केलेले आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला