चिकन-मटणच्या डिशमध्ये उंदरांचे मांस; वांद्रेच्या प्रतिष्ठित पापा पंचो ढाब्यातील घटना!

मुंबई वांद्रे येथील एका प्रतिष्ठित रेस्टॉरंटमध्ये चिकन आणि मटणाच्या डिशमध्ये उंदराचे मांस आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीसांनी ढाब्याचा मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट शिक्वेरा आणि सदर हॉटेलचे आचारी तसेच चिकनचा पुरवठा करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दि. १३ ऑगस्टच्या रात्री एका ग्राहकाने त्याच्या जेवणात मेलेला उंदीर असल्याची तक्रार केल्यानंतर दि. १४ ऑगस्ट रोजी वांद्रे येथील एका प्रतिष्ठित रेस्टॉरंटच्या मॅनेजर आणि आचारी याला अटक करण्यात आली. याप्रकरणी सोमवारी एफआयआर नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (FIR) नुसार, १३ ऑगस्च रोजी अनुराग सिंग आणि त्याचा साथीदार वांद्रे पश्चिम येथील पाली नाका येथे असलेल्या पापा पंचो ढाब्यावर गेले होते. त्याने रोटीसोबत चिकन आणि मटणाची प्लेट ऑर्डर केली. जेवताना त्याची नजर वेगळ्याच मांसाच्या तुकड्यावर पडली. बारकाईने तपासणी केली असता ते उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचे त्यांना समजले.

ताजा खबरें