जळगाव मधील उलटी खोबडीचे अभियंता!

जळगाव – शहरातील प्रभाग १५, महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्ष नेता पतीदेव सुनिल महाजन यांचा प्रभाग आहे.यात डी मार्ट कडून ईच्छा देवी चौक कडे नैसर्गिक प्रवाह मागील दोनशे वर्षांपासून गटार बनून वाहात आहे.आता महापौर,, आयुक्त, अभियंता यांना काय कुबुद्धी सुचली ,त्यांनी हा प्रवाह चढावाच्या दिशेने उलटा करून तांबापुरा मधे आणून सोडला.आता पाऊस पडला तर याची गटार गंगा तांबापुरा मधील घरांमधे,दुकानांमध्ये शिरली.त्यात फक्त पाणीच नव्हे,गटारीचे छत्तीस मसाल्याचे पाणी,बेडूक,साप,विंचू,खेकडे या किडेमकोडेसहित गरीबांची घरे , दुकाने व्यापली.येथील गरीब लोकांनी कशीबशी घरे साफ केली.पण हे संकट पावसाळ्यात जास्त जीवघेणे ठरणार आहे.

याबाबत महापौर जयश्री महाजन व सुनिल महाजन यांना काही माणुसकी वगैरे नसावी.आमदार सुरेश भोळे तर गिरीश महाजन यांचा वाढदिवस मनवण्यात व्यस्त आहेत.किंवा त्यांना यांच्यातील काही कळतच नसावे.मी समजावून सांगितले,तरीही डोक्यात प्रकाश पडलाच नाही.

शेवटी आम्ही शिवराम पाटील राकेश वाघ व शेख लुकमान, त्या त्रस्त नागरिकांना घेऊन महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड यांना भेटून ही समस्या मांडली.त्या एमपीएससी आहेत, सुशिक्षित आहेत तर अपेक्षा ठेवतो.हे कळेल तरी.त्यांना कळले,समजले पण म्हणे हे काम सा.बां.अभियंता करीत आहेत.यावर आम्ही आक्षेप घेतला की,सा.बांधकाम नव्हे, मुख्यमंत्री शिंदेंची हिंमत नाही कि, आयुक्त आणि शहर अभियंता यांची परवानगी न घेता जळगाव चा एक खडा इकडचा तिकडे करतील.असे म्हटल्यावर कुठे त्यांना थोडे पदाचे अवसान आले.कबूल केले की,” हम भी किसी से कम नहीं.लेकिन सच बोलनेका दम नहीं.”

आम्ही त्यांना आश्वासन दिले ,पाठबळ दिले की,कोणी राजकीय नेता, आमदार खासदार मंत्री हरामखोरी करीत असेल,चुकीचे काम करीत असेल तर मला सांगा किंवा त्यांना माझे नांव सांगा.त्यांची लगाम खेचणे,माझी जबाबदारी.असेही अलीगल्लीत ते गुलाल टाकून नाचतात,टारगट पोरांसोबत .तर आपण नाचवू त्यांना येथे शहाण्या लोकांसमोर. तेंव्हा कुठे आयुक्त बाईंना हिंमत आली.म्हणे काका,मी येते.पाहाणी करते,सा.बां.च्या सोनवणे किंवा सुर्यवंशींना सोबत बोलवते.

खरे म्हणजे, नगरसेवक, महापौर आणि आमदार यांची ही जबाबदारी आहे कि, आपल्या प्रभागात, मतदारसंघात आपण जनहिताचे काम करून घेतले पाहिजे.पण यांना कमिशन मिळाले कि,ही माणसे निर्बुद्ध सारखी वागतात.जळगांव शहरातील असा एकही नगरसेवक नाही,असा आमदार सुद्धा नाही,जो मतदारांना मतांचे पैसे देत नाही.त्यांच्याकडून मतदारांनी, नागरिकांनी चांगल्या कामाची अपेक्षा करूच नये.अशांना पैसे दारू मटण मिळाले तरीही पुन्हा निवडून देऊ नये.

जर आमदारांना किंवा कोणा नगरसेवकांना याबाबत आक्षेप असेल तर ,यावे समोर .आणि मुलांची शपथ घेऊन सांगावे की,मी मतांचे पैसे दिले नाही आणि रस्ता गटार कामाचे कमीशन घेतले नाही. आम्ही जळगाव शहरातील या समस्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहातो.बोलतो.तेंव्हा नगरसेवक त्या नागरिकांना दम भरतात.अरे!त्या शिवराम काकांना का बोलवले?तो माणूस काहीमाही बोलतो.मग काय,गुलाबाचे फुल देऊ?

अरे, नगरसेवकांनो, तुम्ही प्रामाणिक असते तर मला कोणी बोलवलेच नसते.तुमच्या कमीशनखोरी आणि लांचखोरीमुळे जळगाव ची ही वाईट स्थिती झाली आहे.आणि नगरसेवक गब्बर झाले आहेत.नगरपालिका कंगाल आणि नगरसेवक मालामाल?

शिवराम पाटील ९२७०९६३१२२.महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव

jalgaonsandesh

jalgaonsandesh