उद्धव ठाकरेंच्या बारसू येथील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना भेटण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा 6 मे ला बारसूचा दौरा करणार आहेत. ठाकरे गटाने रानतळे येथे त्यांच्या सभेचे नियोजन केले होते. मात्र, पोलिसांनी उद्धव ठाकरेंना सभेची परवानगी नाकारली आहे. प्रशासनाने रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी त्यांना दिली आहे. पण तिथे सभा घेता येणार नाही.

रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले असून, या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांना उद्धव ठाकरे भेटणार आहेत. मुंबईत झालेल्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरेंनी सरकारला बारसूवरुन इशारा दिला होता. बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही. तिथे मी 6 तारखेला जाऊन बोलणार आहे. मी तेव्हा बारसूसाठी पत्र दिले होते. मात्र, असा अत्याचार करून प्रकल्प उभारा म्हणून पत्र दिले नव्हते, असा घणाघाती हल्लाबोल त्यांनी शिंदे-भाजप सरकारवर केला होता. त्यामुळे सभेदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून पोलिसांनी उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली आहे. उद्धव ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh