राहुल गांधीं यांना दोन वर्षांची शिक्षा!

सुरत न्यायालयाचा जामीन मंजूर

सुरत : मोदी या आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला असून राहुल गांधींचा जामीन मंजूर झाला आहे.

राहुल गांधींनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून टीका केली होती. कर्नाटक रॅलीत बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की- सर्व चोरांचे आडनाव मोदी का? या विधानावरून त्यांच्याविरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला सुरू होता. यासंदर्भात सुरतच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.