वांजोळा येथे बारा गाड्या व यात्रा शांततेत !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील वांजोळा येथे श्री मरीमाता यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढण्यात आल्या. बारा गाड्या भगत राहुल दोडे यांनी ओढल्या तर बगले म्हणून भागवत कोळी व मुकेश मोरे यांनी सहकार्य केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती तसेच गावात मिठाई, खेळणी, सौंदर्य प्रसाधने व पाळणे अशी दुकाने थाटण्यात आली होती. रात्री लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले होते.

यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी सहकार्य केले. यात्रा शांततेत पार पडली.