एल. आर. बाली यांच्या निधनाने सच्चा भीमसैनिक हरपला: जयसिंग वाघ

जळगाव – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी, समता सैनिक दल पंजाब शाखेचे सदस्य, आर. पी.आय. पंजाबचे सचिव, भीम – पत्रिका चे संपादक, प्रसिद्ध हिंदी लेखक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सलग दहा वर्षे काम केलेले एल. आर. बाली यांचे ९८ व्या वर्षी आज ६ जुलै रोजी निधन झाले. बाली यांच्या निधनाने एक सच्चा भीम सैनिक हरपला असे मत प्रसिद्ध साहित्तीक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले.

एल. आर. बाली यांच्या निधना बद्दल शोक व्यक्त करतांना जयसिंग वाघ यांनी सांगितले की, बाली यांनी जालंधर येथे आंबेडकरी चळवळ अत्यंत जोरात चालविली, ते बाबासाहेबांचे अत्यंत विश्वासू व जवळचे सहकारी होते, त्यांनी पंजाब राज्यात स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन, समता सैनिक दल व पुढं रिपब्लिकन पक्ष यात राज्यपातळीवर काम करुन आंबेडकरी विचार गावपातळीवर नेले, पंजाब राज्यात ही चळवळ बाबासाहेबांच्या नंतरही १९९० पर्यंत मोठ्या जोमाने काम करीत होती त्यात बाली हे आघड़ीवर होते. भीम पत्रिका हे साप्ताहिक त्यांनी सुरु केले ते भारतात व विदेशातही वितरित होत होते. त्यांनी रंगीला गांधी हे पुस्तक लिहून देशात मोठी खळबळ उडवून‌ दिली, बाली यांना त्या वेळेस जीवे ठार मारण्याच्या धामक्या आल्या पण ते घाबरले नाही. ते धाड़सी, करारी व जिद्दी होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली असे वाघ यांनी प्रसिद्धि पत्रकात नमूद केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh