कोळी समाजातील उपवर-वधुंनी सामूहिक विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा.. तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांचे आवाहन.
चोपडा – वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगीतेत म्हटलेले आहे की, लग्नाकरिता कर्ज करावे ! जन्मभर व्याज भरीत जावे !! लग्नासाठी कफल्लक व्हावे ! हे कोण्या देवे सांगितले !!..यानुसार जळगाव येथील आदिवासी कोळी समाज बहुउद्देशीय संस्था व सत्पात्री दानशूर व्यक्तींच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे यावर्षीही २८ एप्रिल २०२४ (वार- रविवार) रोजी दु. स्टॅं. टा. १२:३५ वाजता खान्देश बिग बाजार आवारात संकल्पित ५१ जोडप्यांचा संपूर्ण मोफत सामुहिक विवाह संस्कार सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी जिल्हाभरातील कोळी समाजाच्या गावागावात जोरदार प्रचार प्रसार सुरू आहे. वधूवरांना सोन्याचे मंगळसूत्र, लग्नड्रेस, बुटचप्पल, संसारोपयोगी वस्तू देण्यात येतील. लग्नप्रसंगी स्टेज गेट मंडप भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. विवाह नोंदणी २८ मार्च २०२४ पर्यंत शनी मंदिरासमोरील शिवभक्त निवास चत्रभुज सोनवणे यांचे संपर्क कार्यालय या ठिकाणी सुरू आहे. नोंदणी प्रसंगी वर वधूंचे लि.स., आधारकार्ड, फोटो, दोघांच्या नातेवाईकांचे संमतीपत्र अत्यावश्यक आहे.
याप्रसंगी म. वाल्मिकी ऋषींच्या मंदिरापासुन आदिवासी कोळी नृत्य, लेझीम पथकांसह सवाद्य भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात येणार असून वरवधू व वऱ्हाडींना सजवलेल्या बैलजोडी गाडीवर बसविण्यात येणार आहे. जिल्ह्याभरातील सर्वपक्षीय नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विविध सामा. संस्था संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते, स्नेहीप्रेमी, पत्रकार मित्रमंडळी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
हा सामुहिक विवाह सोहळा यशस्वीतेसाठी जळगावचे माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे यांचेसह संस्थेचे अध्यक्ष नगरसेवक भरत सपकाळे, उपाध्यक्ष गोकुळ सूर्यवंशी, सचिव रोहन सोनवणे, संघटक अनिल सोनवणे, उपकार्याध्यक्ष भिकनराव नन्नवरे, सल्लागार रामचंद्र तायडे, खजिनदार जितेंद्र सोनवणे, कार्याध्यक्ष अक्षयकुमार सोनवणे, सहसचिव आनंद सपकाळे, मिडीयाप्रमुख रवींद्र पाटील, प्रसिद्धीप्रमुख संजय बाविस्कर, सदस्य गणेश बाविस्कर, रवींद्र सोनवणे, शिवाजी सूर्यवंशी, समाधान नन्नवरे, नारायण सपकाळे, सागर सोनवणे, दीपक कोळी हे विशेष परिश्रम घेत आहेत. आदिवासी कोळी समाजातील गरजू व विवाहेच्छुंक वधूवरांनी या सामुदायिक विवाह संस्कार सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर गोरगावले बुद्रुक यांनी या पत्रकान्वये केले आहे.