गोजोरा येथे आमदार व जेष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील गोजोरा येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्षलागवड करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी आ.संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी रस्त्याच्या दुतर्फा व दिसेल त्या ठिकाणी वृक्षारोपण करुन संगोपन करण्यात येणार असल्याचे सरपंच सौ नंदा कोळी व सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कोळी यांनी सांगितले आहे.

यावेळी आमदारांनी सांगितले की आपापल्या घरासमोर तसेच वाडी वस्तीत वृक्षलागवड करणे गरजेचे आहे असे सांगितले.

यावेळी गावातील जेष्ठ नागरिक त्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. जेष्ठ नागरिक व महिलांनी एकत्र येऊन वृक्षारोपण केले व लावलेले वृक्ष जगवून दाखविण्याचा संकल्प केला आहे.

यावेळी उपसरपंच चंद्रकांत पाटील, सदस्य भास्कर दोडे, उपसभापती शिवाजी पाटील, व गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटी चे पदाधिकारी ग्रामसेवक मोहन पाटील, गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच युवा क्रांती अभ्यासिका चे युवक गावातील महिला, बचत गटाच्या महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.