निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का, जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगाव – निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. जळगावमधील  पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत काल रात्री हा पक्षप्रवेश पार पडला..

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील. बुलढाण्याचे खा. प्रतापराव जाधव, माजी आ. चिमणराव पाटीला उपस्थित होते..

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास 400 कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील , बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते जवळपास 60 ते 70 वाहनातून बुलढाण्यात पोहोचले होते. बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे पार पडलेल्या पक्षप्रवेश समारोहाच्या वेळी मोठी घोषणाबाजी झाली यामुळे मात्र जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का पोहोचला आहे.