बंद घरचे कुलूप तोडून, तब्बल १ लाख ११ हजार ६०० रूपयांचा ऐवज लांबविला

जळगाव – शहरातील शिव कॉलनी परिसरातील तरूणाचे बंद घर फोडून घरातून ॲम्लीफायर, बॅटरी, माईक वायर, मिक्सर असा एकुण १ लाख ११ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीला आले आहे.

याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रदीप सुदाम वाणी (वय-३६) रा. भवानी मंदीराजवळ, मेहरूण हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे शिवकॉलनी येथे घर आहे. या घरात त्याने मंडपा व स्टेज सााठी लागणारे ॲम्लीफायर, बॅटरी, माईक वायर, मिक्सर असे सामान ठेवण्यात आले होते. २९ सप्टेंबर रोजी अडीच वाजता सर्व सामान घरात ठेवून कुलूप लावलेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत ॲम्लीफायर, बॅटरी, माईक वायर, मिक्सरअसा एकुण १ लाख ११ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

हा प्रकार रविवार १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता उघडकीला आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रदीप वाणी यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh