गोंभी येथून तीन बैलांची चोरी ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव नजिक असलेल्या गोंभी येथील तीन बैल चोरीला गेल्याची घटना घडली. या बाबत समजलेली माहिती अशी की गोंभी येथील शेतकरी तुकाराम आत्माराम पाटील व सुरेश आत्माराम पाटील उर्फ सुरेश मिस्तरी यांचे बैल वांजोळा रस्त्यावर मराठी शाळेच्या पुर्वेकडे बांधलेले होते.

मात्र अज्ञात चोरांनी दि.२२ मे चे रात्री ११ ते २३ मे चे पहाटे ४ वाजे दरम्यान तुकाराम आत्माराम पाटील यांच्या मालकीची सव्वा लाख रुपये किंमतीची बैलजोडी व सुरेश मिस्तरी यांचा एक बैल किंमत अंदाजे ४५ हजार रुपये असे तीन बैल चोरुन नेले आहेत. चौथा बैल मारका असल्याने चोरटे त्या बैलाला नेऊ शकले नाही. या बैल चोरी संदर्भात गावोगावी फिरून चौकशी केली जात आहे.