थर्टीफर्स्ट ‘पाव’ला, जळगाव शहरात ३५ हजार लाद्यांची विक्री

जळगाव – सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जळगाव शहरातील नागरिकांनी थर्टी फस्टच्या पार्टीचे आयोजन केले होते. व्हेज खाणाऱ्यांनी पावभाजी, शेवभाजी तसेच भरीतच स्वाद घेण्यास पसंती दिली.

त्यामुळे रविवारी शहरात बेकरी विक्रेत्यांच्या दुकानांवर पावलादी घेण्यासाठी नागरिकांची सायंकाळी एकच गर्दी झालेली होती. जळगाव शहरात सुमारे ३५ हजार पावांच्या लाद्यांची विक्री झाली असल्याचा अंदाज बेकरी व्यवसायिकांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केला.

नववर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शहरात रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ठिकठिकाणी थर्टी फस्टच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. काही नागरिकांनी घरीच बेत आखलेला होता. तर काहींनी पाच ते सहा घरांनी एकत्र येत घरांच्या गच्चीवर कुंटुबांसह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रविवारची सुट्टी असल्याने थर्टी फस्ट साजरा करण्याचा उत्साह चांगलाच नागरिकांमध्ये दिसून आला.

३५ हजार पावांच्या लाद्यांची विक्री

थर्टी फस्टला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पावभाजीचा मेनू पार्टीत ठेवला होता. अनेकांनी बेकरी व्यवसायिकांकडे आधीपासून पावांच्या लाद्यांची ऑडर दिली होती. तर काहींनी घरांजवळील दुकान, बेकरी, दुध केंद्र आदी ठिकाणांवरून पाव लाद्यांची खरेदी केली. चित्रा चौकातील बेकरी विक्रेत्यांनी दुकानाबाहेर पावांच्या लादी विक्रीचे स्टॉल लावले होते. सायंकाळी पाव लाद्या खरेदीसाठी नागरिकांची या स्टॉलवर मोठी गर्दी झाली होती.

शेवभाजी सेंटरवर गर्दी

थर्टी फस्टला शेवभाजी तसेच भरीतवर देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी खायला पसंती दिली. शहरातील शेवभाजी व भरीत सेंटरवर सायंकाळी चार पासून शेवभाजी घेण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी झालेली होती. तर काही ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागलेल्या होत्या.

थर्टी फस्टसाठी पावांच्या लाद्यांची मागणी लक्षात घेता नियोजन केले होते. रविवार आल्याने मार्केटमध्ये गर्दी कमी होती. मात्र संध्याकाळच्या वेळी पाव लाद्याची विक्री चांगली झाली.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला