चेहऱ्यावर लांब लांब केस; हनुमान समजून लोक करू लागले पूजा; एक दिवस अचानक…

रतलाम: मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या ललित पाटीदारला पहिल्यांदा पाहून अनेक जण घाबरतात. कारण त्याच्या चेहऱ्यावर मोठमोठे केस आहेत. जन्मत: त्याच्या चेहऱ्यावर मोठे केस होते. कुटुंबियांनी त्याला डॉक्टरांकडे नेलं. अनेक डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. मात्र उपचार काही होऊ शकले नाहीत. हा एक दुर्मीळ आजार असून त्याच्यावर कोणतेच उपचार नसल्याचं एके दिवशी डॉक्टरांनी सांगितलं. तेव्हापासून कुटुंबाचं चिंता वाढवली.

ललित पाटीदार रतलामच्या नांदलेट गावात राहतो. त्याचे वडील बकटलाल पाटीदार शेती करतात. ललित चार बहिणींचा एकुलता एक भाऊ आहे. गावातील सरकारी महाविद्यालयात तो इयत्ता बारावीत शिकतो. लहानपणापासूनच ललितच्या चेहऱ्यावर मोठे केस होते. त्यामुळे आसपासचे लोक बाल हनुमान समजून त्याची पूजा करू लागले

चेहऱ्यावर केस असल्यानं ललितला जेवताना त्रास व्हायचा. जेवताना, काहीही खाताना केस तोंडात जायचे. या आजारावर सध्या तरी कोणताच उपाय नसल्याचं डॉक्टरांनी त्याला सांगितलं. वयाची एकविशी पूर्ण झाल्यानंतर प्लास्टिक सर्जरी केली जाऊ शकते, असं ललितला बडोद्यातील एका डॉक्टरनं सांगितलं. त्यामुळे आता ललित २१ वर्ष पूर्ण होण्याची वाट पाहत आहे.

एका माध्यम समूहाशी बोलताना ललितनं भविष्यात यूट्यूबर होण्याची इच्छा व्यक्त केली. यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचंही त्यानं सांगितलं. ललितच्या चेहऱ्यावर लहानपणीपासूनच मोठे केस आहेत. आम्ही अनेक डॉक्टरांकडे गेलो. अनेक चाचण्या केल्या. मात्र सगळ्यांनीच या आजारावर उपचार नसल्याचं सांगितलं, अशी माहिती ललितच्या कुटुंबियांनी दिली. आता आम्ही सगळं काही देवावर सोपवलं आहे. एका डॉक्टरांनी प्लास्टिक सर्जरीचा उपाय सांगितला. ललित २१ वर्षांचा झाल्यावर आम्ही सर्जरी करून घेऊ, असं ललितच्या एका नातेवाईकानं सांगितलं.