कुछ तो गडबड है! शपथ घेतल्यानंतर काही तासांतच केरळच्या खासदाराकडून केंद्रीय मंत्रिपदातून मुक्त करण्याची मागणी

रविवारी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपत घेतली. या NDA सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर काही तासांनंतर, केरळचे भाजप खासदार सुरेश गोपी यांनी पदमुक्त करण्याची मागणी केली आहे.

अभिनेते-राजकारणी सुरेश गोपी म्हणाले की, त्यांनी चित्रपट साइन केले आहेत आणि ते कोणत्याही किंमतीत त्यांना करायचं आहेत. तसेच या पदावरून मुक्त होऊन त्रिशूरच्या लोकांसाठी खासदार म्हणून काम करायचं आहे.

‘खासदार म्हणून काम करणं हे माझं उद्दिष्ट आहे. मी काहीही मागितलं नाही. मला या पदाची गरज नाही असं मी म्हटले होतं. मला वाटतं की, मला लवकरच या पदावरून मुक्त केलं जाईल. त्रिशूरच्या मतदारांना कोणतीही अडचण नाही. त्यांना हे माहित आहे आणि खासदार म्हणून मी त्यांच्यासाठी खरोखरच चांगलं काम करेन, मला माझे चित्रपट कोणत्याही किंमतीत करायचे आहेत’, असं सुरेश गोपी यांनी शपथविधी समारंभानंतर दिल्लीतील एका प्रादेशिक वाहिनीशी बोलताना सांगितलं.

सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या नियोजित बैठकीपूर्वी गोपी यांचं वक्तव्य समोर आलं आहे.

गोपी, पक्षाचे ज्येष्ठ नेते जॉर्ज कुरियन यांच्यासह केरळमधील भाजपचे एकमेव उमेदवार होते ज्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं.

NDA सरकारमध्ये गोपींचा समावेश केल्यामुळे, भाजपला 2026 मध्ये निवडणूक होणाऱ्या केरळसाठी त्यांच्या योजनांबद्दलच्या भावना जनतेपर्यंत पोहोचवायच्या होत्या असं ते म्हणाले.

सुरेश गोपी यांनी डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला आणि केरळमधील भाजपचे पहिले खासदार म्हणून इतिहास रचला.

सुरेश गोपी यांनी तिरंगी लढतीत सीपीआयचे व्हीएस सुनील कुमार यांचा 74,000 मतांनी पराभव केला. काँग्रेसनं के मुरलीधरन यांना त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने