सुनसगाव स्मशानभूमीतील लोखंडी कठड्याची चोरी ?

भुसावळ – येथील वाघुर नदीच्या काठावर असलेल्या स्मशानभूमीतील सरण रचण्याचे कठडे चोरांनी चोरून नेल्याने मयत व्यक्तिला मरणा नंतर ही मरण यातना सोसाव्या लागत आहेत.

येथील स्मशानभूमीत गेल्या काही महिन्यांपासून प्रेतावर अंत्यसंस्कार करताना अडचणी येत आहेत विशेष म्हणजे जे लोखंडी कठडे आहे तेच चोरुन नेल्याने लाकडे तसेच गोवऱ्या रचताना त्रास होतो बऱ्याचदा लाकडे आणि गोवऱ्या रचताना खाली पडतात तसेच प्रेत खाली पडते त्यामुळे मरणा नंतर ही मरण यातना सोसाव्या लागतात अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आता सध्या येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रशासक आहे त्यामुळे आता हे महत्त्वाचे असलेले लोखंडी कठडे बसविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली जात आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh