प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – बोदवड तालुक्यातील मुक्तळ या गावाला नाट्य उत्सवाची जूनी परंपरा आहे. ही परंपरा कोरोना काळापासून बंद झालेली होती मात्र आता पुन्हा गावातील जूने कलाकार व नवीन तरुण एकत्र येऊन श्री रामनवमी पासून नाट्य उत्सवाची सुरुवात झाली असून दि. १९ एप्रिल पासून वार शुक्रवारपासून रात्री नऊ वाजता सालाबादप्रमाणे श्रीराम संगीत नाट्य मंडळ गेली शंभर वर्षे जुनी परंपरा कायम टिकवून सुरवात करीत आहे.प्रभाकर गोपाळ जोशी उर्फ बाळू बुवा व जुने सर्व सदस्यांनी त्या काळात कोणतेही साहित्य नसताना व सामग्री नसताना जुने सर्व कंपनीचे स्वर्गवासी भवरलाल ताराचंद जैन, भाऊराव पाटील ,राजाराम गंगाराम पाटील, मनोहर लोहार, शामराव टेलर, तुकाराम टेलर, संदल बागवान व सर्व स्वर्गवासी कंपनीचे जुने सदस्य त्या काळापासून आतापर्यंत खंड न पडता फक्त कोरोना काळातच उत्सव बंद राहिला व जोमाने सुरुवात जिल्ह्यामध्ये मुक्तळ या गावी साक्षात कायम स्वरूपी नाटकाचा वाटा तयार करून सामाजिक पौराणिक व ऐतिहासिक पूर्वी खेळ नाटके सादर करीत होते परंतु टीव्हीच्या युगात सुद्धा जोमाने उत्सव साजरा करण्यासाठी गावातील सर्व लोक मेहनत घेतात यावर्षी प्रथम नाटक शुक्रवारी एकादशीच्या दिवसापासून प्रथम नाटक सौभाग्य लक्ष्मी, दुसरे नाटक राजकारणात रंगली ग्रामपंचायत, तिसरे नाटक देवमाणस, आणि चौथे नाटक माहेरची ओटी
अशा या नाटकांमध्ये गावातीलच तरुण मंडळी भाग घेत आहे पुरातन काळापासून या नाटकांचे कामे उत्सवाचे काम मोठ्या जोमाने तरुण मंडळी करीत आहे तरी हनुमान जयंतीच्या सकाळी नृसिंह अवताराचे सोग काढले जाते खालील सर्व तरुण मंडळी यात सहभागी आहे विविध नाटकांमध्ये गावातील तरुण मंडळी व पात्र करीत आहे कंपनीचे जुने सर्व सदस्य आता हल्ली मॅनेजर कंपनीचे डॉक्टर ब्रिजलाल भवरीलाल जैन कंपनीचे मेकअप मेन व मार्गदर्शक सुनील राजाराम पाटील कंपनीचे व्हाईस मॅनेजर रामदास दयाराम पाटील व नरसिंह अवताराच्या सोंगाची सजावट पंधरा- वर्षापासून रामेश्वर मनोहर लोहार हे करतात कैलास भागवत सुरेश पाटील चिमा जोशी विठ्ठल पवार निखिल रामेश्वर लोहार. किरण वाघमारे विशाल साबळे मंगेश पवार उमेश पाटील गोलु भावसार
वैभव पाटील अशोक मतकर सामांक जैन हर्षल पारधी जीवन पवार गौरव पाटील गोपाल साबळे शुभम साबळे आनंद चव्हाण व लोकेश पाटील इतर गावातील सर्व मंडळी सहकार्य करून शंभर वर्षे व जुनी परंपरा टिकण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात गावातच मध्यभागी श्री राम मंदिर आहे या मंदिरालाच लागून मोठा नाटकाचा वाटा बनवलेला आहे तरी या उत्सवाचा आजूबाजूच्या परिसरातील सर्वांनी लाभ घ्यावा अशे आयोजकांनी कळवले आहे