वराडसिम येथील स्नेह मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांकडून नव्या पिढीला मिळणार रात्रीच्या अवकाश निरीक्षणाची नामी संधी.

सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर

भुसावळ – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील
पंडित नेहरू विद्यालयात सन १९९४ – ९५ या वर्षाच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा नुकताच स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 27 वर्षांनी हा योग घडून आला त्यामुळे सर्व मित्र-मैत्रिणींच्या चेहऱ्यावर कमालीचा उत्साह दिसला सदर प्रसंगी माजी विद्यार्थ्यांकडून नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतच प्रत्यक्ष अवकाशाचे निरीक्षण करता यावे म्हणून वामन वाघ. या माजी विद्यार्थ्यांने अत्याधुनिक असा टेलिस्कोप व भविष्यात सुद्धा आणखी विद्यार्थी उपयोगी साहित्य देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाची सुरुवात दिवंगत झालेल्या गुरुजनांना तसेच मित्रांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच प्रदीर्घ कालखंडानंतर भेटल्याचा आनंद व्यक्त करत आपला परिचय दिला. माजी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शाळा नटली होती. यावेळी सध्या उद्योजक, शिक्षक, व्यापारी, नोकरदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, लोकप्रतिनिधी, वार्ताहर व शेतकरी असलेल्या माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आपल्याला शिकवत असलेल्या गुरुजनांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला. तसेच त्यांना भेटवस्तू श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्या प्रसारक मंडळ वराडसिम, चे उपाध्यक्ष श्री ए के पाटील यांनी भूषवले.
याशिवाय इतर विद्यार्थ्यांकडून सुद्धा लोकसहभाग अंतर्गत गरजू विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा साहित्य खरेदीसाठी योगदान जाहीर करण्यात आले. आभार प्रदर्शनानंतर सर्वांनी भरीतपुरीच्या जेवणाचा आनंद घेतला.