“अविश्वास शब्द बोलता न येणं दुर्दैवी, नारायण राणे यांनी मराठी भाषेची हत्या केली!”

नवी दिल्ली –  काल संसद अधिवेशनात विषय मणिपूरचा सुरु होता.पण काल सत्ताधाऱ्यांनी मणिपूर विषयाला हात पण घातला नाही. तिथं फक्त उद्धव ठाकरे यांचा द्वेष दिसला. नारायण राणे यांचा बोलायचा काय संबंध होता?
ते माहीत नाही. काल राणे यांनी मराठी भाषेचा खून करून टाकला. अविश्वास हा शब्द राणे लोकसभेत बोलू शकले नाहीत. हे राज्याचं नाही तर मोदींचं दुर्देव आहे, असं म्हणत रिफायनरी विरोधी संघटना सदस्य नितीन जठार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघात केला आहे.

आम्हाला बदनाम करण्यासाठी असे आरोप राजकारणी करत आहेत. राजापूरात येऊन तुम्ही लोकांची माफी मागितली पाहिजे. तुमच्या वक्तव्याने कोकणी जनता नाराज झाली आहे. आमचं म्हणणं सामान्य म्हणून आयकून घ्या नाहीतर कोकणी जनतेची माफी मागा… नाहीतर आम्ही कायदेशीर मार्गाने पुढे जाणार आहोत, असं म्हणत नितीन जठार यांनी सरकारला इशारा दिला आहे.

पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितलं की आपला विरोध असेल तर आम्ही प्रकल्प आणणार नाही. आंबा, काजू, मच्छिमारी यावर कोकणी माणूस समाधानी आहे. रिफायनरी आमच्या कोकणला परवडणारी नाही हे आम्ही त्यांना समजून सांगितलं आहे. रिफायनरीचा हा विरोध आता वाढत चालला आहे, असंही जठार म्हणाले.