सौदी अरेबियात उष्णतेमुळे मृतांची संख्या १००० च्या वर i भारतीयांचाही समावेश

जगभरातील देश सध्या भीषण उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. अशातच सौदी अरेबियाच्या कडाक्याच्या उन्हामुळे यंदाच्या हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुचीं मोठी अडचण झाली आहे.

सौदी अरेबियामध्ये आतापर्यंत १००० हून अधिक यात्रेकरुंचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. सौदी अरेबियातील मक्का येथे आतापर्यंत १००० हून अधिक हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या मृतांमध्ये भारतीयांचाही समावेश आहे. जगभरातून लाखो मुस्लिम दरवर्षी हज करण्यासाठी मक्केला पोहोचतात. या वर्षी सुमारे १८ लाख लोक हज यात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. मात्र उष्णतेच्या लाटेमुळे इथली परिस्थिती बिकट बनली आहे. या आठवड्यात मक्कामधील तापमान ५१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.

मक्का हा एक असा प्रदेश आहे जिथे उष्णतेचा कहर फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही दिसून येतो. या ठिकाणचे तापमान हिवाळ्यातही लोकांना अस्वस्थ करते. अशातच आता हज यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुंना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. माध्यमंच्या वृत्तानुसार, आतापर्यंत मक्काध्ये १० देशांतील १०८१ हाजींच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वाधिक ६५८ लोक इजिप्तमधील होते. याशिवाय भारत, जॉर्डन, इंडोनेशिया, इराण, सेनेगल आणि ट्युनिशिया येथील यात्रेकरूंचाही मृत्यू झाला आहे.

मक्का येथे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये भारतीयांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मृतांमध्ये ९० भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही. यावेळी भारतातून सुमारे दोन लाख लोकांनी हज यात्रेसाठी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीही जवळपास तेवढेच लोक हजला गेले होते. दुसरीकडे अनेक यात्रेकरू बेपत्ता असल्याची नोंद झाली आहे. बेपत्ता झालेल्या यात्रेकरुंना शोधण्यात मोठी अडचण येत आहे. बेपत्ता हज यात्रेकरूंचे नातेवाईक रुग्णालयात त्यांच्या प्रियजनांचा शोध घेत आहेत.

हज अधिकाऱ्यांनी यात्रेकरूंना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पुरेसे पाणी प्यावे आणि दिवसातील सर्वात उष्ण तासांमध्ये सूर्यप्रकाश टाळण्याची सूचना केली आहे. सौदी लष्कराने यात्रेकरूंच्या मदतीसाठी १६०० हून अधिक सैनिक तैनात केले आहेत. त्याचबरोबर ३० जलद कृती पथकेही तैनात करण्यात आली आहेत. ५ हजारांहून अधिक स्वयंसेवकही तैनात करण्यात आले आहेत.

उष्णता वाढण्याचे कारण काय?

या भागातील तापमान दर १० वर्षांनी ०.४ अंश सेल्सिअसने वाढत असल्याचे अभ्यासातून समोर आलं आहे. सौदी नॅशनल सेंटर फॉर मेट्रोलॉजीच्या म्हणण्यानुसार, मक्काच्या आसपास उष्णता आणि दमछाक करणारे उष्ण हवामान अनुभवले जात आहे. मक्का सौदी अरेबियाच्या दक्षिणेला आहे.त्यामुळे उत्तर व मध्य भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यापासून हे ठिकाण वंचित आहे. मक्केच्या हवामानावरही लाल समुद्राचा प्रभाव दिसून येतो. संध्याकाळच्या वेळी, समुद्राची वारे किनारपट्टी आणि आजूबाजूच्या भागात गरम करतात. त्याचा परिणाम या भागातही दिसून येत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील

जळगावातील चोपडा बसस्थानक महाराष्ट्रात टॉप; स्वच्छ, सुंदर बसस्थानक स्पर्धेचा निकाल जाहीर

चोपडा – एसटी महामंडळाने घेतलेल्या “हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक” अभियानांतर्गत ‘अ’ वर्गामध्ये राज्यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानकाचा प्रथम

पंडित प्रदीप मिश्रा यांच्यावर पोलीस कारवाई होणार

भोपाळ – कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्याविरोधात उज्जैनमधील जिवाजीगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर आणि

राहुल गांधी विठुरायाचा आशीर्वाद घेणार, पंढरीच्या वारीत वारकऱ्यांसोबत पायी चालणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 उमेदवार निवडून आल्याने

ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई; सीईओंनी काढले निलंबनाचे आदेश

जळगाव – जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात असून त्यांना ग्रामसेवकपदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य

दोन दुचाकींच्या धडकेत अमळनेर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

अमळनेर – दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात शाळकरी विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील ढेकू शिवारातील इंडीयन गॅस एजन्सी

जळगावात आयटीआयला उद्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर जळगाव, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने