‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाम ही काफी है, किरण माने यांची पोस्ट व्हायरल

अभिनेते किरण माने हे कायम राजकीय मुद्द्यांवर त्यांचे परखड मत मांडत असतात. नुकतीच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक पोस्ट लिहली आहे. एक्स या सोशल साईटवर त्यांनी लिहलेल्या पोस्टमधून त्यांनी उद्धव ठाकरेंबाबतची त्यांचे मत व्यक्त केले आहे.

”उद्धवजींच्या लोकप्रियतेचं गमक हे आहे की त्यांनी बाळासाहेबांना आंधळेपणानं ‘कॉपी पेस्ट’ नाही केले ! स्वतंत्र व्यक्तीमत्त्व म्हणून ते जनतेसमोर आले. स्वत:च्या ओरिजीनल शैली महत्त्वाची मानली. स्वत:चा म्हणून एक विचार जपला. समजा एखादा अभिनेता महान आहे… जागतिक दर्जाचा आहे. म्हणून तो गेल्यानंतर त्याच्यासाठी लिहीलेली भुमिका त्याची उत्तम मिमिक्री करणार्‍याला, हुबेहुब त्याच्यासारख्या दिसणार्‍या कलाकाराला कधीही देत नाहीत. त्याच्या गुणवत्तेची बरोबरी असेल अशा स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाच्या अभिनेत्याला ती भुमिका मिळते. उद्धवजींनी ठरवलं असतं तर बाळासाहेबांचं नांव ‘कॅश’ करणं अवघड नव्हतं. साक्षात मुलगा आहे तो त्यांचा. “माझ्या उद्धवला सांभाळा” ही बाळासाहेबांची साद आजही मराठी माणसाच्या काळजावर कोरलेली आहे. तरीही उद्धवजींनी काळाची पावलं ओळखून प्रबोधनकारांच्या हिंदूत्वाचं बोट धरलं. तिथंच ते जिंकले. आज बाळासाहेब असते तरी आजच्या अत्यंत नासलेल्या, सडलेल्या, विषारी भवतालात त्यांनी हेच केलं असतं. आपण नेहमी म्हणतो बघा. ‘आज पु.ल., निळूभाऊ, श्रीराम लागू असते तर पुरोगामी विचार मांडल्यावर खुप ट्रोल झाले असते.’ … तसंच आज जे बाळासाहेबांचं नांव ‘वापरून’ त्यांचा फायदा घेऊ पहाताहेत, त्यांनीही बाळासाहेब हयात असते तर त्यांची तमा ठेवली नसती हे कटू सत्य आहे ! हे लोक ईडीला आणि दडपशाहीला घाबरून बाळासाहेबांना सोडून गेले असते आणि बाळासाहेबांवरही हेच हिंदुत्व सोडल्याचे आरोप केले असते. बाळासाहेबांनीही आज वर्चस्ववाद्यांना राक्षसी फायदा होईल अशी धार्मिकता टाळली असती. या कपटी कावेबाजांना कधीच दूर केले असते. त्यांनी कायम त्या-त्या भवतालानुसार आवश्यक त्या भुमिका घेतल्या. त्या स्वबळावर पेलल्या. कुणाच्याही नांवाचा आधार न घेता लढले. तेच आज उद्धवजी करताहेत, म्हणून ते जनमानसाच्या हृदयात आहेत. आज राजकारणात युती-आघाडी करावी लागणं ही काळाची गरज असते. पण ती करताना उद्धवजींनी कधी लाचारी पत्करली नाही. बाळासाहेबांचंही हिंदुत्व लाचार हतबल नव्हतं. पवारसाहेब, राहुल, सोनियाजी यांच्या बरोबरीने उद्धवजींच्या मताला किंमत असते. स्थानिक काँग्रेसचा दबाव असून सांगलीची जागा शिवसेनेला मिळणं ही त्यांच्या ताकदीची पावती आहे. तसेच कोल्हापूरला काँग्रेसच्या जागेचा यथोचित आदर करणं हे त्यांच्या नितळ मनाचं लक्षण आहे. देशपातळीवरही इंडिया आघाडीच्या मिटींग्जमध्ये उद्धवजींच्या शब्दाला वजन असते. आत्ता सत्तेसोबत गेलेल्यांची एकेका जागेसाठीची लाचारी, हतबलता पाहून कळतंय की उद्धवजींनी केलं ते योग्यच केलं. ‘जिथं आपल्या शब्दाला किंमत नाही तिथं लाथ घालायची’, हा स्वाभिमानी बाणा तर बाळासाहेबांचा ! तो उद्धवजींमध्ये आहे म्हणून सर्वसामान्यांचं प्रेम त्यांना लाभतंय. कुणी कितीही आपटा… तो त्याच्या बापाचं नांव लावतो, उसन्या बापाची गरज नाही त्याला. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नाम ही काफी है ! ईषय कट, अशी जबरदस्त पोस्ट किरण माने यांनी शेअर केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील