या प्रकारानंतर रुग्णालयाच्या बाहेर पोस्टर लावण्यात आलं आणि बुलडोझर आणण्यात आला. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर परिस्थिती निवळली.
महापालिकेच्या आर्मी ब्रिगेडमधील निवृत्त सैनिक सुरेन कुमार यांच्यावर लखनौमधील ठाणे बिजनौर येथील विनायक मेडिकेअर या खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
रुग्णालय प्रशासनानं सांगितले की, महापौर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शूज घालून ICUमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, ज्यात त्यांनी अडथळा आणला.
मात्र, रुग्णालयाच्या संचालिका मुद्रिका सिंग यांनी कर्मचारी आणि नगराध्यक्ष यांच्यातील वादाचं वृत्त खोटं असल्याचं म्हटलं आहे.
पत्रकारांशी बोलताना रुग्णालय संचालक म्हणाले की, महापौरांनी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधला. त्यांच्यात कोणताही वाद झाला नाही, असं सिंग म्हणाले.
‘मीडिया आणि सोशल प्लॅटफॉर्मवर महापौर आणि डॉक्टरांच्या भेटीसंदर्भात दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. हे दावे पूर्णपणे निराधार आहेत आणि हे व्हायरल केलं जाऊ नये’, अशी विनंती सिंग यांनी पुढे केली.