विवाह प्रसंगी भेट वस्तू न देता, वधु, वरास उर्वेश साळुंखे यांच्या कडुन एक झाड भेट….

जळगाव – लग्नकार्य म्हटलं की सगेसोयरे, मित्रमंडळी व हितचिंतक शुभेच्छा देण्यासाठी शाल, श्रीफळ फुले व बुके आकर्षक, सुंदर व महागड्या भेटवस्तू आणत असतात. मात्र बुधगाव येथील पर्यावरण प्रेमी पुरस्कार प्राप्त उर्वेश साळुंखे यांनी आगळीवेगळी कल्पना मांडत शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ व ‘पाणी बचती’ झाडे लावा झाडे जगवा,या पर्यावरण पूरक संदेश म्हणून वर सागर व वधु माधुरी यांना शुभेच्छा म्हणून एक झाड भेट दिले.

जल, जंगल, जमीन वाचविणे ही काळाजी गरज असून ते लक्षात घेऊन शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने शहरी व ग्रामीण भागात ‘माझी वसुंधरा अभियान’ सुरू केलेलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून शहरे व खेडे ही पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीच्या ओघात सहभागी होत असून जल,जंगल, जमिन वाचविण्याच्या सर्व बाबी व घटकांवर काम केले जात आहे.

अमीर खानच्या ‘पाणी फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात पाणी वाचविण्यासाठी मोठी चळवळ व मोहीम उभी राहिली आहे. या चळवळीत बुधगाव येथील पर्यावरण प्रेमी पुरस्कार प्राप्त उर्वेश साळुंखे काम करत असून त्यासोबतच बुधगाव ग्राम पंचायतीने शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात सहभाग नोंदविला आहे.

शासनाचा हा उपक्रम व पाणी फाउंडेशच्या पाण्याची चळवळ ही समाजाच्या प्रत्येक घटकांत पोहोचायला म्हणून त्यांनी त्यांच्या भावाच्या विवाहप्रसंगी उपनगर मोहाडी येथे शुक्रवार दि. १५ डिसेंबर रोजी विवाह सोहळ्यात एक झाड भेट दिले.

या विवाह प्रसंगी सामाजिक राजकीय शैक्षणिक नातेवाईक, सकाळ पाहुणे आले होते‌. घराघरात, समाजात हि पर्यावरणाचा प्रसार ते या माध्यमातून करत राहतील. त्यांच्या या छोट्याशा स्तुत्य उपक्रमाचे अंमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील माजी नगरअध्यक्ष पुष्पलता पाटील व सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन केले जात आहे.

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh