जळगावातील हद्दपार केल्याने संशयित आरोपीची प्रांताधिकाऱ्यांना फोनवरून धमकी

जळगाव – प्रांताधिकाऱ्यांना सागरपार्क येथील निवासस्थानी असतांना फोनवरून एकाने हद्दपार करण्याच्या कारणावरून धमकी व जाब विचारणा केल्याचा प्रकार शुक्रवारी सायकाळी उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण रघुनाथ सपकाळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगावचे प्रांताधिकारी महेश सुधाळकर हे शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी सायकाळी ६ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीत ते आपल्या निवासस्थान परिसरात मोटार सायकलवर असतांना पलीकडून त्यांना मोबाईलवर कॉल आला. पलीकडून बोलणाऱ्‍या भुषण रघुनाथ सपकाळे याने महेश सुधळकर यांना मला हद्दपार का केले अशी धमकी वजाब विचारणा केली. याप्रकरणी शनिवारी २३ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता महेश सुधळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंद नगर पोलिस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. विठ्ठल पाटील करत आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh