वीरेंद्र मंडोरा
जळगाव -ग्राम विकास विभागाच्या दिनांक 12.12.2000 रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा शिक्षक पुरस्कार देण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सन 2022-23 या वर्षासाठी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यातून प्रस्ताव मागणी करण्यात आलेले एकुण 26 प्रस्तावांपैकी दिनांक 24/8/2022 रोजी जिल्हा पुरस्कार समितीने सर्व शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या असून त्यापैकी एकुण 15 शिक्षकांच्या प्रस्तावास मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक यांच्याकडेस मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला होता. सदर प्रस्तावास दिनांक 2/9/2022 रोजी मा. विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांची मान्यता प्राप्त झाली असुन जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी खालील प्रमाणे .
1 ) श्रीमती दर्शना नथ्थु चौधरी,जि.प.शाळा शिरुड ता. अमळनेर
2 )श्रीमती मनिषा गोकुळ अहिरराव जि.प.शाळा यशवंत नगर भडगांव ता. भडगांव
3 )श्री. रविंद्र माणिक पढार
जि.प.शाळा मांडवेदिगर ता. भुसावळ
4 )श्रीमती मनिषा नारायण कचोरे .जि.प.शाळा मनुर बु. ता. बोदवड
5)श्री.. उत्तम धर्मा चव्हाण
जि.प.उच्च प्राथ शाळा शिवापुर ता. चाळीसगांव
6)श्री. विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील
जि.प.शाळा नागलवाडी ता. चोपडा
7)श्री. संजय पोपट गायकवाड
जि.प.शाळा मुसळी ता. धरणगांव
8)श्री. लक्ष्मण वामन कोळी
जि.प.शाळा चंदनबर्डी ता.एरंडोल
9)श्रीमती ललिता नितीन पाटील
जि.प. मुलींची शाळा कानळदा ता. जळगांव
10)श्रीमती किर्ती बाबुराव घोंगडे.जि.प.प्राथ मुलींची शाळा पहुर कसबे ता. जामनेर
11)श्री. विजय वसंत चौधरी.जि.प.प्राथ शाळा पिंप्रीनांदु ता. मुक्ताईनगर
12)पाचोरा श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत
जि.प.शाळा राजुरी ता. पाचोरा
13)श्रीमती छाया प्रभाकर भामरे
जि.प.प्राथ शाळा मोंढाळे ता. पारोळा
14 रावेर श्री. रामराव ज्ञानोबा मुरकुटे
जि.प.प्राथ शाळा खिरोदा प्रथा ता. रावेर
15)श्री. समाधान प्रभाकर कोळी
जि.प.केंद्र शाळा साकळी ता. यावल
सदर शिक्षकांना पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 05/09/2022 रोजीस मा. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगांव येथे सकाळी 11.00 वाजता आयोजीत करण्यात आलेला असुन तेथे वरील सर्व शिक्षकांनी सहपरिवार तसेच सन 2020-21 व सन 2021-22 मध्ये पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी देखील उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.