शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला असून यात किशोर दराडे हे विजयी झाले आहेत त्यांना २६४७५ मते मिळाली आहेत.

यावेळी नाशिक येथे जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढी चे अध्यक्ष एस डी भिरुड, संचालक डिगंबर पाटील, सिध्देश्वर वाघुळदे, शिक्षक नेते संभाजी पाटील, भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे पी सपकाळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष समाधान महाजन,भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढी चे अध्यक्ष गोपाळ पाटील, माजी अध्यक्ष डि ए पाटील, माध्यमिक शिक्षक संघ व पीडीएफ चे नेते एस के पाटील व जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी मतमोजणी साठी जुक्टो संघटना प्रमुख प्रा.शैलेश राणे, मिलिंद पाटील, निलेश पाटील हे हजर होते.