प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवाशी विठ्ठल पंडित शिरसाळे ( कुंभार ) हा तरुण सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करीत होता. दोन तीन वेळा प्रयत्न केला मात्र यश येत नव्हते तरीही हार न मानता या तरुणाने प्रयत्न सुरू ठेवले अखेर अग्निवीर दलात या तरुणाची निवड झाली आहे. विठ्ठल शिरसाळे याचा मोठा भाऊ आकाश शिरसाळे हा पुणे येथे सैन्य दलात आहे.
घरची परिस्थिती बेताची असूनही नियमित व्यायाम व जिद्द चिकाटी च्या माध्यमातून या तरुणाने यश निर्माण केले आहे.