विरेंद्र मंडोरा
समाजाने वाळीत टाकले, आई मोळी विकायची – स्टीक, दूध घ्यायला नव्हते पैसे..
ऑलंपिकमध्ये हरूनही मने जिंकणारा भारतीय महिला हॉकी संघ…!
ऑलंपिकमध्ये प्रथमच उपांत्य फेरीत पोहचलेल्या भारतीय संघाला इंग्लंडच्या संघाकडून पराभूत व्हावे लागले आणि सामना हरूनही देशवासीयांची मने जिंकणारा भारतीय महिला संघ चर्चेत आला. ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या ते हुशार विद्यार्थी नापास होता असतांना, ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्याच महिला संघाने उपांत्य फेरीत धडक मारत भारतीय जनतेला हॉकीतील सुवर्णकाळाची आठवण करून दिली. भारतीय महिलांची कामगिरी स्वप्नवत अशी होती. त्यांचा हा सर्व प्रवास सांघिक असला तरी या सर्व मोत्यांना जोडणारा प्रमुख धागा असणारा अमूल्य असा मोती म्हणजे संघाची कर्णधार राणी रामपाल.