जळगाव :- तुरखेडा गाव वासियांनी 78वा स्वतंत्रता दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी युनिसेफ आणि स्मार्ट नवी दिल्ली द्वारा प्रायोजित कार्यक्रम हंडाजी पाणी बचाओ अभियानाची सुरुवात रेडिओ मनभावन 90.8 एफ.एम. द्वारा नागरिकांना पाणी बचतीची शपथ देऊन करण्यात आली. याप्रसंगी गावकऱ्यांनी शोषण खड्डा तयार करण्याचा संकल्प केला.
गावच्या सरपंच मंगलाताई सपकाळे यांनी गावात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती उपस्थितांना दिली. लवकरच गावात पिण्याच्या स्वच्छ पाण्याची Ro युनिट ची उभारणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. रेडिओ मनभावांचे संचालक अमोल देशमुख यांनी हंडाजी पाणी बचाव अभियानाची पार्श्वभूमी उपस्थित तांना सांगितली. एक नळ जर लिक असेल तर दिवसभरात जवळपास 15 लिटर पाण्याची नासाडी होते लिक नळ दुरुस्त करून हजारो लिटर पाणी वाचवता येतं ह्याचं प्रात्यक्षिक त्यांनी दिलं.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, रेडिओ मनभावांचे संचालक अमोल देशमुख, भावेश भावसार, दिव्या पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.